प्रतिनिधी
मुंबई : ऑक्टोबर २०२० साली भाजपा पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेल्या एकनाथ खडसे यांनी एक महाराष्ट्रद्रोही चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. खान्देशाला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याची मागणी खडसे यांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून विदर्भ वेगळा देण्याची मागणी सुरू असून त्यामध्ये आता खान्देशचाही समावेश झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून खान्देशातील अनेक प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याने ही मागणी केल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. Eknath khadse demands separate kanhdesh from maharashtra
जळगावातील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून एकनाथ खडसेंनी शिंदे – फडणवीस सरकारच्या कारभारावर निशाणा साधला. खान्देशात कोणतेही प्रकल्प होत नाही, त्यामुळे विकास रखडला आहे आणि त्यामुळे इच्छा नसतानाही खान्देश महाराष्ट्रापासून वेगळा करावा, असे म्हणावे लागत आहे, असा दावा खडसे यांनी यावेळी केला.
एकनाथ खडसेंच्या मतदारसंघातील वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रापाठोपाठ, आता पशु वैद्यकीय महाविद्यालय देखील शासनाने दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले आहे. मात्र जिल्ह्यातील मंत्री निमूटपणे त्याकडे पाहत आहेत, मी एकटाच बोलतो पण सरकार कुठलीही कारवाई करत नसल्याचा दावाही एकनाथ खडसे यांनी केला.
विकासच जर थांबला असेल आणि सातत्याने खान्देशवर अन्याय होत असेल तर मग कुणाकडे बघावं, असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. सत्तेत असणाऱ्या गिरीश महाजन असतील किंवा मंत्री गुलाबराव पाटील असतील, त्यांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावावी आणि जळगावच्या विकासाचे प्रकल्प पुन्हा खान्देशात आणावेत, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.
Eknath khadse demands separate kanhdesh from maharashtra
महत्वाच्या बातम्या
- 2000 च्या नोटांची कायदेशीर वैधता 30 सप्टेंबर 2023 नंतरही चालूच राहणार!!; रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांचे स्पष्टीकरण
- दिल्ली सरकारच्या अधिकारांबाबत केंद्राने आणला अध्यादेश; बदली-पोस्टिंगचा निर्णय एकट्या मुख्यमंत्र्यांना नाही घेता येणार!
- ‘ज्ञानवापी’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती
- 2000 च्या नोटा मागे घेणे हा नोटबंदीचा धक्का नव्हे; तर छोट्या करन्सी कडे जाण्याचा मार्ग!!