विशेष प्रतिनिधी
मुंबई : Khadse महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत २५ वर्षांपूर्वीच्या सिंचन प्रकल्पावरून नवा राजकीय वाद पेटला आहे. १९९९ मधील भाजप आणि शिवसेना युती सरकारच्या काळात ‘पार्टी फंडा’साठी प्रकल्पांची किंमत वाढवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. मात्र, अजित पवारांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जोरदार पलटवार केला असून, “एवढी वर्षे तुम्ही भ्रष्टाचाराची माहिती दडवून ठेवली, म्हणजे तुम्हीही त्यात सामील आहात का?” असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित करत, तुमच्याकडची फाईल आता सार्वजनिक कराच, असे आव्हान अजित पवारांना दिले.Khadse
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याच्या आरोपांवरून भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, “१९९९ मध्ये जेव्हा मी जलसंपदा मंत्री झालो, तेव्हा पुणे जिल्ह्यातील ‘पुरंदर उपसा सिंचन योजने’ची फाईल माझ्याकडे आली. या प्रकल्पाची मूळ किंमत २०० कोटी असताना ती ३१० कोटी दाखवण्यात आली होती. चौकशी केली असता अधिकाऱ्यांनी कबूल केले की, तत्कालीन सरकारने १०० कोटी रुपये पार्टी फंडासाठी मागितले होते आणि त्यात अधिकाऱ्यांनी स्वतःचे १० कोटी वाढवून किंमत ३१० कोटी केली होती. ती फाईल आजही माझ्याकडे आहे.”Khadse
एकनाथ खडसेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या या आरोपांनंतर त्या काळात जलसंपदा मंत्री राहिलेल्या एकनाथ खडसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. खडसे म्हणाले, अजित दादांना २५ वर्षांनंतर याची आठवण झाली का? जर तुम्हाला भ्रष्टाचाराची माहिती होती, तर २५ वर्षे ती का दडवली? याचा अर्थ तुम्ही भ्रष्टाचाराला संरक्षण दिले आहे.
१०० कोटी वाढवण्यासाठी मूळ किंमत मोठी असायला हवी. पार्टी फंडासाठी एस्टिमेट वाढवणे किंवा अबव्ह टेंडर देणे असे प्रकार माझ्या काळात झाले नाहीत. अजितदादांनी केवळ मोघम बोलू नये. ती फाईल कोणती, तो प्रकल्प कोणता हे जनतेसमोर उघड करावे. ती फाईल सार्वजनिक करावी आणि सत्यता तपासून घ्यावी, असे आव्हान एकनाथ खडसे यांनी अजित पवारांना दिले.
भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न
खडसे यांनी पुढे असाही आरोप केला की, सिंचन घोटाळ्याच्या आरोपावरून स्वतःवरचे लक्ष विचलित करण्यासाठी अजित पवार जुन्या प्रकरणांचा आधार घेत आहेत. “दादांनी जर कारवाई केली नाही, तर त्याचा अर्थ त्यांनी तो भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. आता केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे आरोप करणे चुकीचे आहे,” असेही खडसे यांनी नमूद केले.
Khadse Challenges Ajit Pawar Over 25 Year Silence on Irrigation Scam
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे बंधूंच्या मराठी अजेंड्यावर सुजात आंबेडकर यांचा जोरदार प्रहार!!
- 5 फेब्रुवारी पर्यंत पवार काका – पुतण्यांची एकी; पण केंद्रीय मंत्रिपदासाठी सुप्रिया सुळे यांचे घोडे पुढे दामटले जाताच पुन्हा बेकी!!
- Manoj Sinha : जम्मू-काश्मिरात 5 सरकारी कर्मचारी बडतर्फ, अतिरेक्यांशी होते संबंध; एलजी मनोज सिन्हा यांची कारवाई
- Rajouri Drone :जम्मू-काश्मिरात नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद ड्रोन दिसले; 3 दिवसांतील दुसरी घटना