• Download App
    एकनाथ खडसेंवर राष्ट्रवादीची विधान परिषद गटनेतेपदाची जबाबदारी; याला राष्ट्रवादीचे भाजपीकरण म्हणायचे का?? Eknath khadse appointed NCP group leader in maharashtra legislative council, is it BJPnization of NCP??

    एकनाथ खडसेंवर राष्ट्रवादीची विधान परिषद गटनेतेपदाची जबाबदारी; याला राष्ट्रवादीचे भाजपीकरण म्हणायचे का??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 40 – 50 नेते भाजपमध्ये जाऊन आमदार झाल्याचे खोचक उद्गार अजितदादा पवार यांच्यासह अनेक नेते काढून भाजपला डिवचत असतात. पण याच राष्ट्रवादीने आता भाजपमधून आलेले एकनाथ खडसे यांच्यावर विधान परिषदेतल्या गटनेते पदाची जबाबदारी सोपवून राष्ट्रवादीचे भाजपीकरण झाल्याचा प्रश्न निर्माण केला आहे. Eknath khadse appointed NCP group leader in maharashtra legislative council, is it BJPnization of NCP??

    देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रदेश भाजपातील नेत्यांशी पंगा घेऊन राष्ट्रवादीत दाखल झालेल्या एकनाथ खडसे यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादीने खडसे यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदावर निवड केली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी याबाबतची घोषणा केली.

    राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांच्या गटनेतेपदी नियुक्तीचे पत्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना दिले होते. शुक्रवारी त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


    मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा : सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांनी डिवचले शिवसेनेला; प्रत्युत्तर दिले नाना पटोलेंनी!!


    राज्यात भाजपा वाढवण्यात मोठे योगदान असलेल्या एकनाथ खडसे यांनी स्वपक्षातील काही नेत्यांशी पंगा घेत २३ ऑक्टोबर २०२० रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेत आमदारकी दिली. खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे. त्यामुळे गटनेतेपदी त्यांची नियुक्ती करत राष्ट्रवादीने भाजपला मोठे आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    पण भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या नेत्याची विधान परिषदेतील गटनेते पदावर नियुक्ती करणे हे काही फक्त एकनाथ खडसे यांच्याच बाबतीत घडलेले नाही. याआधी धनंजय मुंडे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला, तेव्हा त्यांना देखील राष्ट्रवादीने गट नेते पदाची जबाबदारी देऊन विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते केले होते. त्यावेळी विधान परिषदेत एकमेकांचे सख्खे मित्रच एकमेकांसमोर मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणून बसत असत. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि धनंजय मुंडे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते.

    राष्ट्रवादीचे नेते नेहमीच भाजपला आमच्यातलेच 40 – 50 नेते नेऊन त्यांना आमदार केले, अशा शब्दांमध्ये डिवचत असतात. मग आधी धनंजय मुंडे आणि आता एकनाथ खडसे यांना भाजपमधून राष्ट्रवादीत घेऊन विधान परिषदेतल्या गट नेते पदाची जबाबदारी देऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतःच स्व पक्षाचे भाजपीकरण केले आहे का??, हा प्रश्न निर्माण होत आहे.

    Eknath khadse appointed NCP group leader in maharashtra legislative council, is it BJPnization of NCP??

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस