• Download App
    आठ वर्षीय मुलाच्या खुनाचा अखेर उलगडा - खडणीसाठी अपहरण केलेल्या मुलाने आरडाओरड केल्याने केला खून|Eight years boy murder case open by pcmc police, accused arrested by chikhali police

    आठ वर्षीय मुलाच्या खुनाचा अखेर उलगडा – खडणीसाठी अपहरण केलेल्या मुलाने आरडाओरड केल्याने केला खून

    चिखलीतील आठ वर्षीय मुलाच्या खुनाचा अखेर उलगडा झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे .


    विशेष प्रतिनिधी

    पुणे – चिखलीतील आठ वर्षीय मुलाच्या खुनाचा अखेर उलगडा झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून दरम्यान, मुलाच्या खुनाचा प्रकार उघडकीस येऊन ४८ तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागत नसल्याने नातेवाईकांनी मंगळवारीही चिखली पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. सायंकाळी खुनाचा छडा लागल्यानंतर नातेवाईकांनी अखेर दोन दिवसांनी मृतदेह ताब्यात घेतला.Eight years boy murder case open by pcmc police, accused arrested by chikhali police

    खडणीसाठी अपहरण केलेल्या मुलाने आरडाओरड केल्याने त्याचे खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.लक्ष्मण बाबूलाल देवासी (वय ८, रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी बापिल अहमद रईस लष्कर (वय -२६, रा. चिखली, पुणे, मु रा. सिलचार, आसाम) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.



    लक्ष्मण रविवारी (१७ एप्रिल) दुपारी साडेबाराच्या सुमारास घरातून बाहेर गेला. बराच वेळ होऊनही तो घरी न आल्याने कुटूंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो न सापडल्याने लक्ष्मणचे अपहरण केल्याची शंका व्यक्त करत
    कुटूंबियांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शोध घेत असताना सायंकाळी सातच्या सुमारास लक्ष्मणचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या एका पडक्या पत्राशेडमध्ये आढळून आला.

    सिमेंट ब्लॉक डोक्यात मारून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले. खुनाची घटना उघडकीस येऊन २४ तास उलटल्यानंतरही पोलीसांच्या हाती कोणतेच धागेदोरे लागले नाहीत. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी चिखली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. मारेकऱ्याला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला.

    त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.चिखली पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीतून काहीच निष्पन्न होत नव्हते. मंगळवारीही दिवसभर पोलिसांचा तपास सुरूच होता. त्यामुळे नातेवाईकांच्या संतापाचा उद्रेक झाला. आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. अखेर मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. त्यानंतर नातेवाईकांनी लक्ष्मणचा मृतदेह ताब्यात घेतला.

    एक लाखाच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण

    पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले की, आरोपी बापील अहमद लष्कर हा एका कंपनीत सीएनजी ऑपरेटर म्हणून काम करत होता आणि त्याची नोकरी गेली होती. मयत मुलाचे वडील यांचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांच्याकडून एक लाखाची खंडणी घेण्यासाठी आरोपीने लक्ष्मण देवासी याचे अपहरण केले.

    परंतू अपहरण केल्यानंतर मुलगा एका खड्ड्यात पडला आणि त्याच्या डोक्याला इजा झाल्याने तो रडून आरडाओरड करू लागला, त्यामुळे आरोपी घाबरला आणि याची कुठे वाच्याता होऊ नये म्हणून मुलाचा डोक्यात दगड मारुन खून केला. गुंडा विरोधी पथकाने यागुन्ह्याचा तपास करताना एकूण ८३ ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासणी केली.

    Eight years boy murder case open by pcmc police, accused arrested by chikhali police

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!