• Download App
    महाराष्ट्र एनएसएसच्या आठ विद्यार्थ्यांचा राजपथ पथसंचलनासाठी सराव Eight Maharashtra NSS students practice for Rajpath road movement

    महाराष्ट्र एनएसएसच्या आठ विद्यार्थ्यांचा राजपथ पथसंचलनासाठी सराव

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या ऐतिहासिक राजपथावर आणि करिअप्पा परेड ग्राऊंडवर महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे(एनएसएस) ८आणि गोव्यातील २ असे एकूण १० विद्यार्थी-विद्यार्थीनी  कसून सराव करीत आहेत. Eight Maharashtra NSS students practice for Rajpath road movement

    यावर्षी ७३व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एनएसएस सराव शिबिराला येथील चाणक्यपुरी भागातील इंटरनॅशनल यूथ होस्टेलमध्ये १ जानेवारी  पासून सुरुवात झाली आहे. देशभरातील १५ विभागांमधून एकूण १५० एनएसएसचे विद्यार्थी- विद्यार्थीनी या शिबिरात सहभागी झाले आहेत. पश्चिम (पुणे) विभागात समावेश असणाऱ्या महाराष्ट्रातून ४ विद्यार्थी आणि ४ विद्यार्थीनी तर गोव्यातून प्रत्येकी १ विद्यार्थी आणि १ विद्यार्थीनी असे एकूण १० विद्यार्थी- विद्यार्थीनी  या शिबीरात सराव करीत आहेत.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी एनएसएस सराव शिबिरात महाराष्ट्रातील ८ विद्यार्थी- विद्यार्थीनी सहभागी झाल्या आहेत. दरवर्षी महाराष्ट्रातून १४ विद्यार्थी- विद्यार्थीनी सहभागी होतात, तसेच देशभरातून २०० ऐवजी १५० विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग आहे.

    हे शिबीर ३१ जानेवारी पर्यंत चालणार असून यामध्ये दररोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रभातफेरी,योगासने,बौध्दिकसत्र,सांस्कृतिक कार्यक्रम आणि पथसंचलनाचा सराव करण्यात येतो अशी  माहिती महाराष्ट्राच्या चमुचे समन्वयक तथा गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी येथील केवळरामजी हरडे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. पवन नाईक यांनी दिली.

    १ ते १५ जानेवारी पर्यंत सकाळी व सायंकाळी जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर पथसंचलनाचा सराव चालला,तर १६ जानेवारीपासून सकाळी राजपथावर आणि सायंकाळी करिअप्पा परेड ग्राऊंडवर पथसंचलन सराव सुरु असल्याचे डॉ. नाईक यांनी सांगितले.

    Eight Maharashtra NSS students practice for Rajpath road movement

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस