विशेष प्रतिनिधी
पुणे : सर्व नोंदणीकृत ट्रस्ट व धर्मादाय संस्थांनी पुढील आर्थिक वर्षाचे प्रस्तावित उत्पन्न व खर्च दर्शविणारे अंदाजपत्रक सादर करणे आवश्यक आहे. धर्मादाय नियम १९५१ मधील ‘नियम १६ अ’ प्रमाणे ज्या धार्मिक ट्रस्टचे वार्षिक उत्पन्न पाच हजार रुपयांपेक्षा जास्त व इतर धर्मादाय संस्थांचे दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असेल त्यांना असे बजेट सादर करावे लागेल. Eight day left to submit the trust’s budget
अशाप्रकारे अंदाजपत्रक सादर केले नाही तर वार्षिक लेखा परिक्षण अहवाल (ॲाडिट) मध्ये तशी नोंद केली जाते. अशी नोंद विश्वस्तांची अकार्यक्षमता म्हणून समजली जावू शकते, अशी माहिती पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे अध्यक्ष ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदार यांनी सांगितली.
त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायदा १९५० चे कलम ‘३१ अ’ नुसार या अंदाजपत्रकात एक एप्रिल पासून सुरू होणाऱ्या संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये संस्थेच्या मालमत्तेमध्ये होणारी वाढ अथवा विक्रीद्वारे येणारी रक्कम, उद्दिष्टनिहाय तसेच प्रशासकीय खर्चासाठीची तरतूद, संस्थेचे काही विशेष उपक्रम सुरू होणार असतील तर त्यासाठीच्या आर्थिक नियोजन, संस्थेची देणी, कर्जफेड आदी बाबतचे नियोजन याची माहिती देणे गरजेचे आहे.
त्याच प्रमाणे ट्रस्टच्या नावे बॅंकेमधील मुदत ठेवी व त्यांवर मिळणारे व्याज, इतर गुंतवणूक व त्यावरील परतावा, खाजगी देणग्या, सीएसआर प्रकल्प, शासकीय अनुदान अशा सर्व उत्पन्न स्त्रोतांची माहिती अंदाजपत्रकात नमूद करावी लागते. या सोबत विद्यमान कालावधीत कार्यरत सर्व विशवस्तांची नावे तसेच त्यांनी हे पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मान्य केल्याचा ठराव सोबत जोडावा लागतो.
याबाबतची संपूर्ण माहिती विश्वस्त कायद्याच्या ‘परिशिष्ट ७ अ’ मध्ये छापील नमुन्यात भरून २८ फेब्रुवारी पूर्वी संबंधित धर्मादाय कार्यालयांच्या लेखा शाखे मध्ये जमा करून त्याची पोहोच घ्यावी लागते. सर्व ट्रस्ट व धर्मादाय संस्थांनी आपल्या चार्टर्ड अकौंटन्ट यांचेशी संपर्क करून बजेट दाखल करण्याची वेळेत पूर्तता करणे आवश्यक आहे.
Eight day left to submit the trust’s budget
महत्त्वाच्या बातम्या