• Download App
    शिक्षण सम्राट आणि प्रस्थापित मराठा नेतेच विकासाचे खरे विरोधक; प्रकाश आंबेडकरांनी घातला आरक्षणाच्या मूळ मुद्द्याला हात!! Education emperors and established Maratha leaders are the real opponents of development

    शिक्षण सम्राट आणि प्रस्थापित मराठा नेतेच विकासाचे खरे विरोधक; प्रकाश आंबेडकरांनी घातला आरक्षणाच्या मूळ मुद्द्याला हात!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा वाद पेटला असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाच्या मूळ मुद्द्याला हात घालत नेमक्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. Education emperors and established Maratha leaders are the real opponents of development

    महाराष्ट्रातले सध्याचे शिक्षण सम्राट आणि प्रस्थापित मराठा नेते हेच खरे विकासाचे विरोधक आहेत. त्यांनी आपल्या शिक्षण संस्था टिकवण्यासाठी इतर शिक्षण संस्था महाराष्ट्रात येऊच दिल्या नाहीत. त्यांनी शैक्षणिक क्षेत्र संकुचित करून ठेवले. त्यामुळे महाराष्ट्रात रोजगार निर्मितीक्षम शिक्षण व्यवस्था निर्माण होऊ शकली नाही, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी पार्कवरील संविधान बचाव रॅलीत केला.

    सध्याचे ओबीसी नेते देखील मंडल बरोबर नव्हते तर कमंडल बरोबर होते अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांच्या शिवसेनेच्या मूळावर आघात केला.



    प्रकाश आंबेडकर म्हणाले :

    राज्यात सध्या आरक्षणावरुन मराठा आणि ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला आहे. दोन समाजांना एकमेकांविरुद्ध झुंजवण्याचे काम सुरू आहे. पण ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये. कारण इतिहास जर काढला तर तुम्ही मंडलबरोबर नव्हता तर कमंडल बरोबर होतात, मग ते शेंडगे असतील किंवा भुजबळ असतील. ओबीसींचे आरक्षण मिळवणारे आम्हीच आहोत, जनता दलाबरोबर आणि त्यापूर्वी जनता पार्टीबरोबर. आत्ता आरक्षण वाचवता येत नाही म्हणून भिडवण्याची भाषा सुरू आहे.

    आरक्षण हा विकासाचा मार्ग नव्हे, ते फक्त प्रतिनिधित्व

    दुर्देवानं इथल्या शासनानं विकासाच्या योजना आखल्याच नाहीत म्हणून आपला विकास करुन घ्यायचा असेल तर आरक्षण हा एकमेव मार्ग आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे. आरक्षण हा काही विकासाचा मार्ग नाही तर ते फक्त प्रतिनिधित्व आहे.

    राजे-महाराजांच्या काळात शूद्र, अतिशुद्रांना म्हणजे आत्ताचे ओबीसी आणि दलित-आदिवासी यांना अशांना त्यांच्या दरबारात चोपदार होण्याचाही अधिकार नव्हता. शिवाजी महाराजांचा कालखंड सोडला तर उरलेल्या काळात नव्हताच. प्रशासनाततर नव्हताच. त्यामुळे उद्या जी लोकशाही देशात ही लोक पुन्हा बाहेर राहू नयेत म्हणून आरक्षण आले.

    आरक्षणवादी आणि आरक्षणविरोधी हे दोन्ही गट शिक्षण महर्षींचेच आहेत. त्यांनाही हे माहिती आहे की, आज भारतातून परदेशात शिक्षणासाठी विद्यार्थी किती जातात? 20 लाख विद्यार्थी बाहेर शिकायला जातात. एका विद्यार्थ्यावर 40 खर्च होत असेल, तर किती निधी बाहेर जातो हे लक्षात घ्या.

    सध्याचे जे शिक्षण सम्राट आणि मराठा नेते आहेत तेच इथल्या विकासाचे विरोधक आहेत. कारण आपल्याच संस्था चालल्या पाहिजेत म्हणून त्यांनी नव्या संस्था येऊच दिल्या नाहीत आणि त्यांनी शिक्षणक्षेत्र संकूचित केले. त्यामुळे करोडो रुपयांचा निधी परदेशात जात राहिला, ज्यातून देशात रोजगार निर्माण होऊ शकला असता. देशात दरवर्षी नव्याने 20 लाख रोजगार तयार होऊ शकले असते पण तसे घडले नाही. कारण या शिक्षण सम्राट आणि प्रस्थापित मराठा नेत्यांमुळे करोडो रुपयांचा निधी परदेशात गेला. त्याचा दुष्परिणाम रोजगारावर झाला आणि त्यातून आरक्षणासारखा प्रश्न गंभीर झाला.

    Education emperors and established Maratha leaders are the real opponents of development

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा