ईडी वायरकर आणि इतर आरोपींना चौकशीसाठी समन्स बजावू शकते.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते रवींद्र वायकर हे महाराष्ट्रातील केंद्रीय अन्वेषण यंत्रणा म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आले आहेत. EDs radar comes crime registered against Uddhav Thackerays close aide Ravindra Vaikar
बीएमसीसोबतच्या कराराचे उल्लंघन करून मुंबईतील जोगेश्वरी येथे एका आलिशान हॉटेलच्या बांधकामाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना (उबाठा) आमदार रवींद्र वायकर, त्यांची पत्नी आणि इतरांविरुद्ध पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी वायरकर आणि इतर आरोपींना चौकशीसाठी समन्स बजावू शकते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी रवींद्र वायकर यांच्याकडून या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि जबाब घेतले आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिलेली ही जबानी आहे.
EDs radar comes crime registered against Uddhav Thackerays close aide Ravindra Vaikar
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation : ”सरकार म्हणून कुठलाही निर्णय घाई गडबडीत घेऊ शकत नाही”, मुख्यमंत्री शिंदेंची स्पष्ट भूमिका!
- world cup 2023 : लंकेचे पुरते पत्ते पिसले, 55 धावांत डाव कोसळला; टीम भारत सेमी फायनल मध्ये!!
- अंगणवाडी सेविकांनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांनाही खुशखबर; दिवाळीत एसटी महामंडळाला 378 कोटींची मदत!!
- मनोज जरांगेंचे उपोषण सुटले; मराठा आरक्षणासाठी सरकारला 2 जानेवारी 2024 पर्यंत दिला वेळ!!