प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना कुख्यात तस्कर आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अखेर ईडीने अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असून न्यायालय त्यांना कोठडी सुनावणार आहे. त्यामुळे आता मलिक यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. जर त्यांना दीर्घकाळ कारागृहात राहावे लागले तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.ED’s allegations against Nawab Malik
याआधीही गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि बाबासाहेब भोसले या दोन माजी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. कारण कायद्यातही तशी तरतूदच आहे. एखाद्या मंत्र्याला अटक झाली तर त्याला कायद्याने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागतो. वनमंत्री संजय राठोड आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही अटक केल्यावर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी पहाटे ताब्यात घेतले, त्यानंतर ८ तास चौकशी केल्यानंतर मलिक यांना अटक करण्यात आली. या चौकशीनंतर मलिक जेव्हा ईडीच्या कार्यालयाबाहेर आले, तेव्हा त्यांना थेट जेजे रुग्णालयात वैद्यकीय चौकशीसाठी नेण्यात आले. त्यावेळी मलिक यांनी हात उंचावत ‘झुकेंगे नही..’ असे जोरदार म्हणत माध्यमांकडे येत होते. मात्र त्याचवेळी त्यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा जवानांनी त्यांना थेट गाडीत बसवून पुढे जेजे रुग्णालयात नेण्यात आले.
नवाब मालिकांवर ईडीचे आरोप
- 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून मलिकांचे पुत्र फराज मलिकांकडून जमीन खरेदी.
- कुर्ल्यातील मोक्याची 3 एकर जागा मलिकांचे पुत्र फराज मलिकांनी खरेदी केल्या
- 30 लाखांतील जमीन खरेदीपैकी 20 लाखांचं पेमेंट केल्याचा मलिकांवर आरोप
- मलिक कुटुंबीयांच्या सॉलिडस कंपनीने 2005 मध्ये शहावली आणि सलीम पटेलांकडून व्यवहार केल्याचा आरोप
- 2005 मध्ये कुर्ल्यातील जमिनीचा भाव 2053 रुपये स्क्वेअर फूट होता. मात्र मलिकांनी खरेदी 25 रुपये स्वेअर फुटांनी केली.
- जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सलीम पटेलच्या नावावर, विक्री सरदार शहा वलीच्या नावावर तर कागदपत्रावरील सही फराज मलिक यांची आहे.
ED’s allegations against Nawab Malik
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांवर ईडी कारवाईचा थेट यूपी निवडणुकीशी संबंध, आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला संशय
- Nawab malik ED : राष्ट्रवादीचे मोर्चे ईडी विरोधात? की चौकशीत “कोणाचे” नाव घेऊ नये म्हणून नवाब मलिकांवर दबावासाठी…??
- भुजबळ, देशमुखांच्या अटकेच्या वेळी मोर्चे नाहीत, फक्त नवाब मलिकांच्या ईडी चौकशीच्या वेळी राष्ट्रवादीचे मोर्चे!!; रहस्य काय??
- औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील परिचारिकांचे विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन
- कोरोना ज्या वूहानच्या लँबोरेटरीमधून निघाला त्याचा मालक बिल गेट्स : मेधा पाटकर यांचा घणाघात