• Download App
    संपादक, लेखक आनंद अंतरकर यांचे निधन|Editor, writer Anand Antarkar passes away

    संपादक, लेखक आनंद अंतरकर यांचे निधन

    हंस‘ , ‘ मोहिनी‘ व ‘नवल‘ या साहित्यिक अंकांचे साक्षेपी संपादक आणि गुणवंत लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या आनंद अंतरकर यांचे, शनिवार, २८ ऑगस्ट रोजी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे: ‘हंस‘ , ‘ मोहिनी‘ व ‘नवल‘ या साहित्यिक अंकांचे साक्षेपी संपादक आणि गुणवंत लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या आनंद अंतरकर यांचे, शनिवार, २८ ऑगस्ट रोजी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले.Editor, writer Anand Antarkar passes away

    आनंद अंतरकर यांच्या पश्चात् पत्नी प्रियदर्शिनी (ग. दि. माडगूळकर यांची कन्या), पुत्र अभिराम, कन्या मानसी आणि जावई सुप्रसिद्ध अभिनेते पंकज विष्णू आहेत. सुप्रसिद्ध सिनेपत्रकार अरुणा अंतरकर, लेखिका अनुराधा औरंगाबादकर आणि चित्रपटकार हेमलता अंतरकर ह्या त्यांच्या भगिनी आहेत.

    महिनाभरापूर्वी त्यांच्यावर पोटाच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. रुग्णशय्येवरूनही ते शेवटच्या क्षणापर्यंत दिवाळी अंकांची कामे निष्ठेने आणि जिद्दीने करत होते.

    Editor, writer Anand Antarkar passes away

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना

    Mumbai Municipal : मुंबईसह सर्व महापालिका निवडणुकांसाठी भाजप-शिंदेसेना युती; 15 ते 20 जानेवारीदरम्यान निवडणुका शक्य