• Download App
    दाऊदशी मनी लॉड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांचे मुलगे अमीर आणि फराज विरोधात ईडी दाखल करणार आरोपपत्र ED to chargesheet soon nawab maik sons aamir and faraz malik

    Navab Malik ED : दाऊदशी मनी लॉड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांचे मुलगे अमीर आणि फराज विरोधात ईडी दाखल करणार आरोपपत्र

    वृत्तसंस्था

    मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉड्रिंग करण्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी नवाब मलिकांच्या दोन्ही मुलांविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहे. ED to chargesheet soon nawab maik sons aamir and faraz malik

    अमीर मलिक आणि फराज मलिक अशी नवाब मलिकांच्या दोन मुलांची नावे आहेत. कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडमधील सुमारे ३ जमीन खरेदी प्रकरणात त्यांनीच दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉड्रिंग केल्याचा आरोप अमीर आणि फराज मलिक यांच्यावर आहे. या दोघांनाही ईडीने अनेकदा चौकशी आणि तपासासाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. परंतु, हे दोघेही चौकशी आणि तपासाला सामोरे जाण्याचे टाळत आहेत.



    या पार्श्वभूमीवर ईडी अमीर आणि फराज मलिक या दोघांविरोधात आरोपपत्र दाखल करून पीएमएलए कोर्टाकडूनच त्यांच्याविरोधातील अटक वॉरंट मिळणार आहे. ईडीने अमीर मलिक याला दोनदा तर फराज मलिक याला तीनदा समन्स पाठवले होते. परंतु, प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे देऊन दोघांनी चौकशीला सामोरे जाण्याचे टाळले आहे. आता थेट आरोपपत्र दाखल झाल्यानंतर कोर्टाने आदेश देताच ईडी या दोघांनाही अटक करून मनी लॉड्रिंग प्रकरणाचा तपास पुढे नेणार आहे. नवाब मलिकांचा मुक्काम सध्या ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहे.

    ED to chargesheet soon nawab maik sons aamir and faraz malik

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस