विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. सूरज चव्हाण अटक प्रकरणात संदीप राऊत यांचीही होणार चौकशी होणार आहे. पुढील आठवड्यात संदीप राऊत यांना चौकशीला हजर राहण्याचे समन्समध्ये सांगण्यात आले आहे. याआधी संदीप राऊत यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनेही चौकशी केली आहे.ED summons Sanjay Raut’s brother in alleged Khichdi scam case; Order to attend inquiry
काय आहे खिचडी घोटाळा?
कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने मुंबईमध्ये अडकून पडलेल्या मजुरांसाठी बृहन्मुंबई महापालिकेने खिचडी वाटप केली होती. खिचडी वाटपाचं कंत्राट आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांनी राजकीय दबावाखाली फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस या खासगी फर्मला मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात ठाकरे गटातील नवनवीन नेत्यांची चौकशी होत आहे.
आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवर ईडीने कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कोविड काळात मुंबई महापालिकेत झालेल्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांची चौकशी केली होती. सुरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहायक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी संघटनात्मक रणनीती बनवण्यात सूरज चव्हाण यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.
ED summons Sanjay Raut’s brother in alleged Khichdi scam case; Order to attend inquiry
महत्वाच्या बातम्या
- स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकरांनी अनुभवला अयोध्येतला अनुपम्य सोहळा, वाचा त्यांच्याच शब्दांत!!
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या गाडीला अपघात, डोक्याला दुखापत
- शिवराज्याभिषेकच्या ३५० व्या महोत्सवानिमित्त कर्तव्य पथावर झळकणार
- भीषण दुर्घटना! 65 युक्रेनियन युद्धकैद्यांना घेऊन जाणारे रशियन लष्करी विमान कोसळले