प्रतिनिधी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तानाट्य सुरू असताना यामध्ये एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. पत्रा चाळ प्रवीण राऊत जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांना ईडीने समन्स पाठवले आहे. संजय राऊत यांना उद्या, मंगळवारी ईडीने चौकशीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. ED summons Sanjay Raut; Arrest me !! Raut’s challenge
सुरुवातीला आपल्याला ईडीचे समन्स आले नाही, असे संजय राऊत यांनी म्हणून या नोटिशीपासून हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. पण आता प्रत्यक्षात ईडीचे समन्स मिळाल्यानंतर मात्र त्यांनी पलटी मारत एक ट्विट केले आहे.
“मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा! जय महाराष्ट्र!,” असे ट्विट त्यांनी केले आहे.
ED summons Sanjay Raut; Arrest me !! Raut’s challenge
महत्वाच्या बातम्या
- राजस्थान सरकारची वाटचाल महाराष्ट्रासारख्या संकटाकडे? सचिन पायलट पुन्हा गेहलोत गटाच्या निशाण्यावर
- Maharashtra Crisis : ‘मविआ सरकार आणखी 2 ते 3 दिवसच टिकणार’, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा मोठा दावा
- Maharashtra Politics : शिंदे यांच्याकडे संख्याबळ होते तर पळून का गेले? राष्ट्रपती राजवट लागणार नाही, शरद पवारांचं मोठं विधान