• Download App
    माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना EDने बजावला तिसरा समन्स; 5 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश । ED Summoned Anil Deshmukh Third Time To appear For Inquiry on 5th July in Mumbai

    माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना EDने बजावला तिसरा समन्स; 5 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

    ED Summoned Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरुद्ध सुरू असलेल्या मनी लाँडरिंगप्रकरणी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देशमुख यांना नवीन समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना 5 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. ED Summoned Anil Deshmukh Third Time To appear For Inquiry on 5th July in Mumbai


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरुद्ध सुरू असलेल्या मनी लाँडरिंगप्रकरणी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देशमुख यांना नवीन समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना 5 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

    राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते देशमुख यांना या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यासमोर हजर होण्यासाठी तिसरे नोटीस बजावण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. देशमुख यांना सोमवारी दक्षिण मुंबईतील केंद्रीय एजन्सीच्या कार्यालयात त्यांचा जबाब नोंदण्यास सांगण्यात आले आहे. 72 वर्षीय देशमुख यांना यापूर्वीही दोन वेळा समन्स बजावण्यात आले होते, परंतु कोरोना संसर्गाचे कारण सांगून ते हजर झाले नाहीत आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी आपला जबाब ईडीसमोर नोंदविण्याची इच्छा व्यक्त केली.

    100 कोटींच्या खंडणीच्या रॅकेटशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात देशमुख यांना ईडीने समन्स बजावले आहे. या आरोपांमुळे देशमुख यांनी यावर्षी एप्रिलमध्ये महाराष्ट्राच्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

    ईडीने गेल्या महिन्यात देशमुख, त्यांचे सहकारी आणि मुंबई व नागपूर येथील अनेक जागांवर छापे टाकले होते. त्यानंतर संचालनालयाने पहिले समन्स बजावले होते. नंतर एजन्सीने त्यांच्या दोन स्वीय सहायकांना अटक केली. त्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि वैयक्तिक सचिव कुंदन शिंदे यांना 6 जुलैपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.

    सूत्रांनी सांगितले की, सध्याच्या खटल्याखेरीज ईडीला देशमुख यांना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या काही शेल कंपन्यांशी संबंधांबद्दलही प्रश्न विचारायचे आहेत. या कंपन्यांचा वापर पैशांची हेराफेरी करण्यासाठी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

    ED Summoned Anil Deshmukh Third Time To appear For Inquiry on 5th July in Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार