प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रात केंद्रीय तपास संस्थांच्या कायदेशीर कारवाई कारवायांचा फास घट्टा आवळत चालला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट भेटल्याची बातमी आली आहे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदेतल्या कार्यालयात 20 मिनिटे भेट घेतल्याची बातमी झी 24 तासने दिली आहे. मात्र या भेटीबाबत मोदी अथवा पवार यांच्या सोशल मीडिया हँडलवर कोणतेही फोटो अद्याप उपलब्ध नाहीत. संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयात जाऊन पवारांनी मोदींची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. दुपारी १२.२० ते १२.४० अशी २० मिनिटे दोघांची चर्चा झाल्याचे बातमीत नमूद करण्यात आले आहे.ED – Sharad Pawar visits Prime Minister Narendra Modi again as CBI probe intensifies
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या आताच्या भेटीचे टाईमिंगही महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी – शिवसेनेच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाया सुरू आहेत. त्याचे राजकीय वर्तुळातही पडसाद उमटत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. अनिल देशमुख यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. नवाब मलिक ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्याची जप्ती सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली नाही. पण शरद पवार मात्र मोदींच्या भेटीला पोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.