प्रतिनिधी
नाशिक : 600 कोटींच्या कर्ज थकीत प्रकरणात सक्त वसुली संचलनालय अर्थात ईडीने घातलेले छापे राजकीय सूडातून नसल्याचा निर्वाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खजिनदार आणि माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन यांनी दिला आहे.ED raids on Rajmal Lakhichand are not out of political
महाराष्ट्रात सध्या ईडी सरकार आहे. राजकीय नेत्यांपेक्षा ईडीचे अधिकारीच कोणी कुठे जायचे, याचा निर्णय घेतात असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्याच पाठीशी उभ्या राहिलेल्या माजी खासदार ईश्वर जैन यांनी राजमल लखीचंद ज्वेलर्स वरील ईडीचे छापे राजकीय सूडापोटी नसल्याचा निर्वाळा दिल्याने त्याला विशेष महत्त्व आहे.
ईडीने 87 लाख रुपयांची कॅश आणि दागिने जप्त केले आहेत. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा ईश्वर जैन यांनी केला. त्याचवेळी त्यांनी स्टेट बँकेतल्या 600 कोटींच्या कर्जाबद्दल आपली बाजू मांडली. सोन्याच्या बदल्यात घेतलेल्या कर्जावर आधी 4 % व्याज होते. परंतु बँकेने परस्पर ते 18% केले. त्यावरून हा वाद आहे. बँकेने या संदर्भात काही चुका केल्या आहेत. त्यामुळे आपला पुण्यातला मुलगा अमरीशने स्टेट बँकेवर केसेस केल्या. त्या केसेस मागे घेतल्या तर आमच्यावरची कारवाई टळेल, असे बँकेचे म्हणणे आहे. या संदर्भात कायद्यानुसार जे होईल त्याला आम्ही सामोरे जाऊ. पण ईडीची कारवाई कुठल्या राजकीय सूडापोटी असेल, असे वाटत नाही, असे वक्तव्य ईश्वर जैन यांनी केले आहे.
त्याच वेळी आपल्या नातवंडांच्या फर्म वेगळ्या आहेत. त्यांचा स्टेट बँकेच्या व्यवहाराशी कुठलाही संबंध नाही. पण ईडीने त्यांची काही कागदपत्रे आणि रकमा सील केल्या आहेत. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे ईश्वर जैन यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे 15 वर्षे खजिनदार
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय दृष्ट्या अस्वस्थता असली तरी आपण शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा निर्वाळा देखील ईश्वर जैन यांनी दिला आहे. ईश्वर जैन हे राज्यसभेचे खासदार होते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 वर्षे खजिनदार होते. जळगाव सह महाराष्ट्राच्या राजकारणात ते विशिष्ट दबदबा राखून आहेत.
ED raids on Rajmal Lakhichand are not out of political
महत्वाच्या बातम्या
- ‘’आगामी निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास नितीन गडकरी …’’ रोहित पवारांचं मोठं विधान!
- द फोकस एक्सप्लेनर : राष्ट्रवादी नेमकी कुणाची? निवडणूक आयोग कोणत्या आधारावर घेते निर्णय? वाचा सविस्तर
- PM Jan Dhan Yojana : जन धन खात्यांची संख्या ५० कोटींच्या पुढे, सरकारने सांगितले इतके लाख कोटी रुपये जमा
- पंतप्रधान मोदी दोन दिवसीय दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार; ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार