• Download App
    अजितदादा + राष्ट्रवादीच्या गोतावळ्यातल्या मंगळदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा ED raids mangaldas bandals houses and arrested him

    अजितदादा + राष्ट्रवादीच्या गोतावळ्यातल्या मंगळदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा; विरोधकांच्या आरोपांची निघाली हवा!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोतावळ्यातले मंगळदास बांदल यांच्या घरावर ईडी पडला छापा, त्यामुळे सुप्रिया सुळे सकट सगळे विरोधकांच्या आरोपातली निघाली हवा!!, असे काल आणि आज घडले. ED raids mangaldas bandals houses and arrested him

    जिल्हा परिषदेचे  माजी सभापती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सध्याचे निकटवर्तीय पैलवान मंगलदास बांदल यांच्या घरावर मंगळवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा घातला. 5 कोटी 26 लाखांची रोकड ताब्यात घेतली. आहे. त्यांच्या दोन्ही निवासस्थानांवर ईडीने छापे घातले. नंतर त्यांना अटक केली.

    पण या सगळ्यात खासदार सुप्रिया सुळे आणि बाकीच्या विरोधकांच्या आरोपांमधली हवा निघाली. कारण ईडी, सीबीआय फक्त विरोधकांच्याच मागे लावतात. विरोधकांच्या घरावर छापे घालून त्यांना त्रास देतात असा आरोप सुप्रिया सुळे आणि बाकीचे विरोधक स्वागत करत असतात पण प्रत्यक्षात आता थेट उपमुख्यमंत्री अजितदादांच्या समर्थकावरच ईडीने छापा घालून त्यांना अटक केल्याने विरोधकांच्या आरोपातली हवा निघाली.

    पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी मंगळदास बांदल यांना २६ मे २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी काही दिवस अगोदर त्यांना जमीन मंजूर झाला होता. दरम्यानच्या काळात त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या. यापूर्वी आयकर विभागाने त्यांच्यावर कारवाई केली होती.


     जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी भाजपकडून राम माधव, जी.किशन रेड्डींवर विशेष जबाबदारी!


    मंगळवारी सकाळी 7 वाजता बांदल यांच्या शिक्रापूर आणि महमंदवाडी (ता हवेली) येथील निवासस्थानावर ईडीने छापे घातले. बांदल यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखा बांदल तसेच भाऊ हे शिक्रापूर येथील  निवासस्थानी होते, तर महमंदवाडी येथील निवासस्थानी मंगलदास बांदल आणि पुतणे होते . रात्री 11.30 वाजेपर्यंत ईडीची कारवाई सुरु होती. यावेळी 5.26 कोटींची रक्कम आणि कोट्यावधीची मनगटी घड्याळे मिळून आल्याचे समजते. यामध्ये रोलेक्स कंपनीच्या घड्याळाचा समावेश असल्याचे  समजते. 16 ते 17 तासांच्या चौकशीनंतर बांदल यांना ईडीने रात्रीच ताब्यात घेऊन मुंबईला रवाना झाले. आज सकाळी त्यांना अटक केली.

    सुनेत्रा पवारांच्या प्रचारात आघाडीवर

    मंगळदास बांदल लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात आघाडीवर होते. त्याआधी त्यांनी वंचित बहुजन आघाडीतून शिरूर मधून लोकसभेचा उमेदवारीचा अर्ज भरला होता. परंतु त्यांनी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मेळाव्याला हजेरी लावल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने त्यांचे तिकीट कापले होते. मंगळदास बांदल हे मूळात राष्ट्रवादीच्या गोताळ्यातले. अखंड राष्ट्रवादीतूनच त्यांना पुणे जिल्हा परिषदेचे तिकीट दिले गेले. निवडूननही आले. राष्ट्रवादीने त्यांना बांधकाम समितीचे सभापती केले. शिवाजीराव भोसले बँक देखील राष्ट्रवादीच्याच गोतावळ्याशी संबंधित आहे. तिच्या घोटाळ्यासंदर्भात आता राष्ट्रवादीचे नेते आता अडचणीत आले आहेत.

    ED raids mangaldas bandals houses and arrested him

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!