• Download App
    ARJUN KHOTKAR : जालना येथील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून तब्बल १२ तास चौकशी; रात्री २ पर्यंत ED पथक जालन्यात । ED raid On Shiv Sena leader Arjun Khotkar’s house At Jalna and interrogate him for 12 hours

    ARJUN KHOTKAR : जालना येथील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून तब्बल १२ तास चौकशी; रात्री २ पर्यंत ED पथक जालन्यात

    • भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर जालना येथील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी ईडीकडे केली होती.
    • जालना बाजार समिती कार्यालय, अर्जुन खोतकर यांचे बंधू संजय खोतकर यांचे कार्यालय आणि खोतकर यांचे निवासस्थान अशा तीन ठिकाणी छापेमारी.

    विशेष प्रतिनिधी

    जालना : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून 12 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. त्याआधी रामनगर साखर कारखाना खरेदीप्रकरणी जालना येथे ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. ED raid On Shiv Sena leader Arjun Khotkar’s house At Jalna and interrogate him for 12 hours

    याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकांवर केंद्रीय संस्थांकडून छापेमारी करण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची तसेच त्यांच्या पत्नीची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या मुलाचीही ईडीकडून चौकशी होणार आहे. राज्यात औरंगाबाद, लातूर, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत ईडीकडून छापेमारी सुरुच आहे.  शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची सलग 12 तास चौकशी सुरु होती. रात्री 2 वाजेपर्यंत ही चौकशी सुरु होती. 2 वाजेनंतर ईडीचं पथक औरंगाबादकडे रवाना झाले आहे. रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीने काल छापेमारी केली.



    काल दुपारी 2 वाजताच्या दरम्यान खोतकर यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले होते. त्यानंतर सलग 12 तास खोतकर यांची चौकशी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर जालना येतील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी ईडीकडे केली होती. त्यानंतर काल ईडीच्या पथकाने जालना बाजार समिती कार्यालय, अर्जुन खोतकर यांचे बंधू संजय खोतकर यांचे कार्यालय आणि खोतकर यांचे निवासस्थान अशा तीन ठिकाणी छापेमारी केली. तसेच काही महत्वपूर्ण कागदपत्रे देखील ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

    ED raid On Shiv Sena leader Arjun Khotkar’s house At Jalna and interrogate him for 12 hours

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नाशिक जिल्ह्यात उद्या ढगफुटीचा इशारा; शाळा, महाविद्यालये आणि ग्रामीण आठवडे बाजार बंद!!; प्रशासन हाय अलर्ट मोडवर!!

    Lohagad Murder Case : सियाने केतनचा खून करण्यासाठी केली राजा रघुवंशी प्रकरणाची स्टडी; सर्च हिस्ट्रीतून रहस्य उघड; हेही विचारले- पोलिस कोठडीत महिलेला मारहाण होते का?

    Ashadhi Wari 2026 : वारीत अत्यावश्यक रुग्णांकरिता प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची माहिती