वृत्तसंस्था
मुंबई – ED ची कारवाई पुढे सरकली असून जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्ज देणाऱ्या सातारा जिल्हा बँकेची ED अर्थात सक्तवसूली संचलनालय चौकशी करणार आहे. तशी नोटीस ED सातारा जिल्हा बँकेला पाठविली आहे. ED notice to satata dist co op bank; 96cr loan to jarandeshawar suger factory
जरंडेश्वर साखर कारखान्याला सातारा जिल्हा बँकेने ९६ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. जिल्हा बँक सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या ताब्यात आहे. आता ED ने याच कर्ज प्रकरणाच्या चौकशीबाबत बँकेला नोटीस पाठविली आहे. परंतु, जरंडेश्वर साखर कारखान्याला फक्त सातारा जिल्हा बँकेनेच कर्ज दिले असे नसून पुणे जिल्हा बँकेनेही कर्ज दिले आहे. ही बँक देखील राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्याच ताब्यात आहे.
त्याच बरोबर अन्य चार बँकांनी देखील जरंडेश्वर कारखान्याला कर्ज दिले आहे. मात्र, यापैकी सध्या फक्त सातारा जिल्हा बँकेला ED ची नोटीस आली आहे. बाकीच्या कर्ज देणाऱ्या बँकांना अद्याप नोटीस आलेली नाही. परंतु, उर्वरित बँकांना देखील लवकर नोटीस देऊन त्यांची देखील चौकशी होऊ शकते, असे सांगितले जात आहे.
ED notice to satata dist co op bank; 96cr loan to jarandeshawar suger factory
विशेष प्रतिनिधी
- फेसबुकवरील कंटेटमुळे समाजाचे ध्रुवीकरण सहज शक्य – सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
- कोरोना काळातही आयटी कंपन्यांची भरभराट, महसुलात दुपटीने वाढ होणार
- ‘बदनाम करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर चुकीचा’, स्मृती इराणींवर आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
- अबब… भारतीय घराणेशाहीही लाजेल! एकाच घरात राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान व सात मंत्री!! श्रीलंकेत फक्त राजपक्ष कुटुंबाचीच सत्ता