• Download App
    अनिल देशमुखांना ED चे उद्या हजर राहण्याचे समन्स; हजर न झाल्यास अटक होणार?? ED issued summons to anil deshmukh to be present tomorrow 11.00 am in mumbai ED office... or will be arrested??

    अनिल देशमुखांना ED चे उद्या हजर राहण्याचे समन्स; हजर न झाल्यास अटक होणार??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – १०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसूली संचलनालयाने ED ने उद्या बुधवारी सकाळी ११ वाजता चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. या समन्सनुसार ते हजर राहिले नाहीत, तर अनिल देशमुखांना ED अटक करू शकते. कारण सुप्रिम कोर्टाने देशमुखांचे अटकेपासून बचावाचे सर्व अर्ज फेटाळले आहेत. ED issued summons to anil deshmukh to be present tomorrow 11.00 am in mumbai ED office… or will be arrested??

    अनिल देशमुख यांनी ईडीच्या अटकेपासून दिलासा मिळावा म्हणून सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने देशमुख यांची याचिका सोमवारी फेटाळून लावली आहे. त्यामुळे देशमुख यांची अटकेपासूनची वाचण्याची सर्व शक्यता संपल्या आहेत. अशा वेळी ईडीने मंगळवारी, १७ ऑगस्ट रोजी देशमुख यांना पाचवे समन्स जारी करून उद्या बुधवारी, सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यावेळी देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर राहतात का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तेव्हा देशमुख यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


    Anil Deshmukh : पालांडे डील करायचे, शिंदे पैसे घ्यायचे, देशमुखांच्या स्वीय सहायकांवर आरोप, ईडी पुन्हा बजावणार समन्स


    मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून १०० कोटींची खंडणी गोळा करून ती वरिष्ठांपर्यंत पोहोचवायचो, अशी साक्ष एपीआय सचिन वाझे याने मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दिली होती. यात मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचाही समावेश होता.

    देशमुख यांनी महिन्याभरापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून सुप्रिम कोर्टाचा जो काही निकाल येईल, त्यानंतर मी ईडीच्या कार्यालयात जबाब देण्यासाठी हजर होईन, असे म्हटले होते. आता सुप्रिम कोर्टाने याचिका फेटाळून लावल्यानंतर देशमुख हे ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार का? दिलेला शब्द पाळणार का?, की फरार होणार… अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

    ED issued summons to anil deshmukh to be present tomorrow 11.00 am in mumbai ED office… or will be arrested??

    विशेष प्रतिनिधी

    Related posts

    Devendra Fadanvis : प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य अग्रणी!

    ‘खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने’ मागील वर्षात १.७० हजार कोटींपेक्षा जास्त केला व्यवसाय

    Zeeshan Siddiqui झिशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी; 10 कोटींची मागितली खंडणी