प्रतिनिधी
सातारा : 100 कोटींच्या घोटाळ्यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची ईडी चौकशी होऊ शकते, तर 1400 कोटींच्या घोटाळ्यात अजित पवारांची चौकशी का होऊ शकत नाही??सा सवाल करत अजित पवारांच्या पाठीशी भाजपच्या बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्या शालिनीताई पाटील यांनी केला आहे. ED investigation of Mushrif in 100 crore scam
शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यासंदर्भात शालिनीताई पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या बाजूने आपला कौल दिला आणि अजित पवार हे घोटाळेबाज असल्याचा आरोप केला. शालिनीताई पाटील या महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी महसूल मंत्री असून त्या अजूनही सक्रिय राजकारणात आहेत. राष्ट्रवादीतील घडामोडींबाबत त्यांनी टिप्पणी केली आहे
एका मराठी खासगी वृत्तवाहिनाला प्रतिक्रिया देताना शालिनीताई पाटील म्हणाल्या की, शरद पवारांनी निवृत्त होण्याची घोषणा करण्याची घाई केली वास्तविक पाहता ते माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहेत. शरद पवारांनी आमदार, खासदारांचं म्हणणं ऐकावं. कार्यकारिणीचं म्हणणं ऐकावं आणि मग योग्य तो निर्णय घ्यावा. असं अचानक निघून जाणं बरोबर नाही. पर्याय जोपर्यंत तुमच्या नरजेसमोर नाही, तोपर्यंत तरी निघून जाणं बरोबर नाही.
मला तरी कुठे निवृत्ती होता येतय?? मी शरद पवारांपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. ते ८० वर्षांचे आहेत मी ९० वर्षांची आहे. पण अजूनही मला लोकं निवृत्त होऊन देत नाहीत, असे शालिनीताई पाटील म्हणाल्या.
‘सुप्रिया सुळेंना द्यावे अध्यक्षपद’
‘अजित पवार यांच्या पाठीशी भाजपचे मोठे नेते असल्यामुळे अद्याप त्यांची ईडीकडून चौकशी झालेली नाही. हसन मुश्रीफांची १०० कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात चौकशी होते, मग जरंडेश्वर कारखान्यात १४०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अजित पवारांना चौकशीसाठी का बोलावले जात नाही?? कारण अजित पवारांवर भाजपच्या मोठ्या नेत्यांचा हात आहे. अजित पवार हे घोटाळेबाज असून काही गुन्ह्यांमध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते. म्हणून अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद देणे चुकीचे ठरले. त्यामुळे सुप्रिया सुळेंनाच अध्यक्षपद द्यायला हवे, असा सल्ला शालिनीताईंनी देत अजित पवारांवर थेट आरोप केला.
ED investigation of Mushrif in 100 crore scam
महत्वाच्या बातम्या
- जंतरमंतरवर कुस्तीगीरांची पोलिसांशी बाचाबाची, बेड नेण्यावरून वाद, पहिलवानांचा आरोप– मद्यधुंद पोलिसांनी मारहाण, शिवीगाळ केली
- जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; AK47, पिस्तूलासह इतर दारूगोळा जप्त
- कर्नाटकात काँग्रेस उमेदवाराच्या भावाच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा, झाडावर आढळले एक कोटी रुपये
- अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सलग दहाव्यांदा वाढवले व्याजदर, 0.25 टक्के वाढ, 16 वर्षांतील सर्वोच्च