विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा ईडी चौकशी होणार असून, आज काही कागदपत्रे रोहित पवार ईडीकडे जमा करण्याची शक्यता आहे. एका कथित घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांची मागील काही दिवसांपासून चौकशी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील रोहित पवारांची मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी झाली आहे.ED interrogation of MLA Rohit Pawar again today; Going to the ED office for the third time in 2 months
बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवार यांची चौकशी सुरू आहे. यासाठी काही कागदपत्र रोहित पवार यांना मागण्यात आली होती. त्याची पुर्ताता करण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले आहे. बारामती अॅग्रोमधील कथित घोटाळ्या प्रकरणी ईडीने बारामती अॅग्रोच्या कार्यालयावर छापेमारी केली होती. त्यानंतर रोहित पवारांना चौकशीसाठीही बोलावण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांची आज पुन्हा ईडी चौकशी होणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी शीखर बँक संबंधित आर्थिक घोटाळ्याचा रोहित पवारांवर आरोप आहे. यापूर्वी रोहित पवारांची 24 जानेवारीला 12 तास आणि 1 फेब्रुवारीला 8.30 तास ईडी चौकशी झाली आहे. तर, आज रोहित पवार यांच्याकडून काही कागदपत्र ईडीकडे सादर केले जाऊ शकतात. विशेष म्हणजे, आजही ईडीच्या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर रोहित पवारांना पुन्हा चौकशीला बोलवण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून रोहित पवारांची ईडी चौकशी केली जात आहे. यापूर्वी दोनदा पवारांची चौकशी करण्यात आली आहे. 24 जानेवारी रोजी ईडी ने बारामती ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड मार्फत कन्नड एसएसके औरंगाबाद या बंद साखर कारखान्याच्या खरेदीशी संबंधित चौकशी केली होती. विशेष म्हणजे यावेळी तब्बल रोहित पवारांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. पुढे 1 फेब्रुवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे पुन्हा समन्स बजावण्यात आले. यावेळी देखील रोहित पवारांची साडेआठ तास चौकशी करण्यात आली होती. आता आज पुन्हा एकदा तिसऱ्यांदा रोहित पवार ईडीच्या चौकशीला सामोर जाणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांच्या ताब्यात गेल्यावर रोहित पवार पहिल्यांदा चौकशीला सामोर जाणार आहेत.