विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील रेस्टॉरंट आणि बार मालकांकडून शंभर कोटींची वसुली करण्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालय याने अर्थात ईडीने अटक केलेले केलेल्या अनिल देखमुखांना न्यायालयाने ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यांच्या कोठडीचा १ दिवस बाकी आहे. ED inquiry of son Rishikesh Deshmukh before the expiry of Anil Deshmukh’s custody
१०० कोटींच्या वसुलीच्या आरोपाखाली माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. ईडीने त्यांना अटक केल्याने देशमुख यांची दिवाळी ईडीच्या कोठडीत जात आहे. त्यात आता ईडीने देशमुखांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. शुक्रवारी, ५ नोव्हेंबर रोजी त्याला सकाळची ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.
अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर जेव्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यांच्या कोठडीचा १ दिवस बाकी आहे. त्या आधीच ईडीने आता देशमुखांच्या मुलाला चौकशीसाठी बोलावले आहे. कदाचित ईडी अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा या दोघांची समोरासमोर चौकशी करेल अन्यथा स्वतंत्र करून उत्तरे पडताळून घेईल. उद्या देशमुख यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशा वेळी जर ईडीने कोठडी मागितली तर तसे ठोस पुरावे सादर करावे लागणार आहेत, ते पुरावे जमा करण्यासाठी ऋषिकेश देशमुखची चौकशी होण्याची शक्यता आहे.
देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाकडे माजी पोलिस आयुक्तर परमवीर सिंह यांनी नुकतेच प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये त्यांनी चक्क देशमुखांच्या आरोपाबाबत पुरावे नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ईडीला आता देशमुखांच्या विरोधात भक्कम पुरावे जमा करावे लागणार आहेत. त्यासाठी त्यांच्या मुलाकडे ईडीने लक्ष केंद्रित केले आहे. सचिन वाझे याने त्याच्या पत्रात बार मालकांकडून ४.७ कोटी रुपये घेऊन ते देशमुखांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिले, जे नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला है पैसे सोपवले. हवाला चॅनेलद्वारे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते, जे बनावट कंपन्या चालवत होते. जैन बांधवांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप आहे. यामध्ये ऋषिकेश देशमुख हा जैन बंधूंच्या संपर्कात होता, असा आरोप आहे.
ED inquiry of son Rishikesh Deshmukh before the expiry of Anil Deshmukh’s custody
महत्त्वाच्या बातम्या
- अद्याप मदत न मिळाल्याने बळीराजासाठी काळी दिवाळी, आमदार श्वेता महालेंचे राज्य सरकारविरोधात आंदोलन
- रक्षा खडसेंची ठाकरे सरकारवर बोचरी टीका ; म्हणाल्या -“घोषणा आणि भाषणांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत”
- दिवाळी स्पेशल; “करे नारी से खरीदारी”; आवाहनाला आनंद महिंद्रा यांचा सकारात्मक प्रतिसाद!!
- भाजपचा ममता यांना सवाल ; आम्ही पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले, तुम्ही ‘ कर ‘ कधी कमी करणार दीदी?