Anil Deshmukh : मनी लाँड्रिंगअंतर्गत अनिल देशमुख आणि त्यांच्या सहायकांविरुद्ध गुन्हा दाखल करणार्या ईडीच्या हाती आणखी काही महत्त्वाची माहिती लागली आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांचे सुपुत्र हृषिकेश देशमुख आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशमुख कुटुंबाच्या देखरेखीखाली अनेक कंपन्या आणि ट्रस्ट चालवल्या जात असल्याचे तपासात समोर आले आहे. ED have strong evidences against Maharashtra Ex home minister Anil Deshmukh his Son and his close aids in 100 Crore Recovery Case
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनी लाँड्रिंगअंतर्गत अनिल देशमुख आणि त्यांच्या सहायकांविरुद्ध गुन्हा दाखल करणार्या ईडीच्या हाती आणखी काही महत्त्वाची माहिती लागली आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांचे सुपुत्र हृषिकेश देशमुख आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशमुख कुटुंबाच्या देखरेखीखाली अनेक कंपन्या आणि ट्रस्ट चालवल्या जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
देशमुखांच्या नियंत्रणाखाली अनेक कंपन्या
अनिल देशमुख यांच्या कुटुंबाच्या थेट नियंत्रणाखालील अशा 11 कंपन्यांविषयी ईडीला माहिती मिळाली आहे. तसेच अशा 13 कंपन्या आहेत ज्या अनिल देशमुख यांच्या कुटुंबाशी संबंधित लोक चालवतात, पण अप्रत्यक्षपणे अनिल देशमुख यांचे कुटुंब त्यांच्यावर नियंत्रण ठेवते. ईडीच्या तपासणीत असे समोर आले आहे की, या कंपन्यांमध्ये वारंवार ट्रान्झॅक्शन्स होत आहेत. 25 जून रोजी ईडीने मुंबई, नागपूर आणि अहमदाबाद येथे 6 ठिकाणी छापे टाकले आणि 6 संचालक आणि 2 सीए यांचे जबाब नोंदवले.
इतरांच्या नावावर अनेक कंपन्या चालवत होते
या सर्वांच्या चौकशीनंतर मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख कुटुंब या लोकांमार्फत वेगवेगळ्या नावाच्या कंपन्या चालवत होते आणि त्यांच्यामार्फत या कंपन्यांचे थेट नियंत्रण देशमुख कुटुंबाच्या ताब्यात होते. जेव्हा ईडीने विक्रम शर्मा नावाच्या डमी संचालकाकडे चौकशी केली तेव्हा या संचालकाने अनिल देशमुख यांचे पुत्र हृषिकेश देशमुख यांचे नाव घेतले आणि सांगितले की, हृषिकेश देशमुख यांनी आपली कंपनी “क्युबिक्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड” स्थापित करण्यासाठी पैसे दिले. विक्रम शर्मा यांनी सांगितले की, अशा आणखी बऱ्याच कंपन्या आहेत.
रेस्टॉरंटची वसुली वाझेंनी देशमुखांच्या पीएला दिली
अनिल देशमुख यांचे सीए प्रकाश रमाणी यांनीही ईडीला सांगितले की, ज्या कंपन्यांची माहिती ईडीकडे आली आहे, अशा सर्व कंपन्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या प्रकरणात ईडीने सचिन वाझे यांचा जबाबही नोंदवला आहे. यासह काही बार आणि रेस्टॉरंट मालकांचेही जबाब नोंदवले आहेत. यात असे दिसून आले आहे की मुंबईच्या झोन 1 ते झोन 12 पर्यंत सर्व पोलिस ठाण्यांतर्गत बार आणि रेस्टॉरंट्सकडून 4 कोटी 70 लाख रुपये वसूल करण्यात आले ते फेब्रुवारीच्या मध्यात सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे यांना दिले. कुंदनला सध्या ईडीने अटक केली आहे.
नागपूरच्या ट्रस्टमध्ये बनावट कंपन्यांनी पैसे दिले
ईडीच्या तपासणीत आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. नागपूरस्थित श्री साई शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष अनिल देशमुख आहेत, तसेच त्यांच्या कुटुंबातील बरेच सदस्य या संस्थेचे विश्वस्त आहेत. अटक केलेले कुंदनदेखील या संस्थेचा सदस्य आहे. चौकशीत असे आढळले की, काही काळासाठी या संस्थेला 4 कोटी 18 लाख रुपये मिळाले आहेत. या संस्थेच्या बँक खात्यातील एंट्री पाहिल्यानंतर ईडीने या संस्थेला पैसे देणार्या कंपन्यांचा शोध घेतला, तेव्हा कळले की या कंपन्या दिल्लीत आहेत, पण केवळ कागदावर आहेत. म्हणजेच या कंपन्यांचा फक्त रोख व्यवहार निकाली काढण्यासाठी वापर केला जात होता, ज्यास शेल कंपन्याही म्हणतात.
हृषिकेश देशमुख यांच्या देखरेखीखाली सर्व काही घडले
तपासादरम्यान या शेल कंपन्यांचे मालक सुरेंद्र जैन आणि वीरेंद्र जैन यांची ईडीने चौकशी केली. चौकशीत असे आढळले की, त्यांच्याशी नागपुरातील एका व्यक्तीने संपर्क साधला होता आणि श्री साई शैक्षणिक संस्थेला रोख रकमेच्या रूपात देणगी देण्याचे सांगितले होते. हवालामार्गे ही रोकड नागपूरहून दिल्लीला पाठविण्यात आली होती आणि त्यानंतर या सेल कंपन्यांच्या माध्यमातून श्री साई शैक्षणिक संस्थेला देणगी म्हणून 4 कोटी 18 लाख रुपये प्राप्त झाले. ईडीनुसार, हे सर्व अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यांच्या देखरेखीखाली घडले.
देशमुखांवर अटकेची टांगती तलवार?
अंमलबजावणी संचालनालयाने भ्रष्टाचार प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न चालवला आहे. अनिल देशमुखांच्या दोन्ही पीएना अटक झाल्यानंतर आता आणखी मोठे धक्कादायक खुलासे होत आहेत. या खुलाशांमुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आता अनिल देशमुखांवरही अटकेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.
ED have strong evidences against Maharashtra Ex home minister Anil Deshmukh his Son and his close aids in 100 Crore Recovery Case
महत्त्वाच्या बातम्या
- क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा, टी-२० विश्वचषक भारतात होण्याची शक्यता धुसर, जय शाह यांचे स्पष्टीकरण
- आंध्र प्रदेश राज्यसेवा आयोगाची मोठी घोषणा, सर्व परीक्षांसाठीच्या मुलाखती यापुढे बंद केल्याचा आदेश
- गोल्ड जिंकल्यास ३, तर सिल्व्हर मेडल जिंकल्यावर २ कोटींचे बक्षीस, ऑलिम्पिक खेळाडूंसाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
- पश्चिम बंगालमध्ये लवकरच लॉन्च होणार Student Credit Card, शिक्षणासाठी मिळणार 10 लाखांपर्यंत लोन
- Ravishankar Vs Twitter : एआर रहमानच्या या गाण्यामुळे झाले होते केंद्रीय मंत्र्यांचे अकाउंट लॉक, ट्विटरचे स्पष्टीकरण