• Download App
    अनिल देशमुख यांच्या सहाय्यकावर ईडीने फास आवळला; मनी लोंड्रींग प्रकरणी आरोपपत्र दाखल|ED files chargesheet against ex-Maharashtra home minister Anil Deshmukh's aides in alleged money laundering case

    अनिल देशमुख यांच्या सहाय्यकावर ईडीने फास आवळला; मनी लोंड्रींग प्रकरणी आरोपपत्र दाखल

    वृत्तसंस्था

    मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सहायकावर अंमलबजावणी (ईडी) संचलनालयाने फास अधिकच आवळला आहे. स्वीय सहाय्यक संजीव पालांडे याच्याविरोधात अंमलबजावणी संचलनालयाने मनी लॉड्रिंग प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.ED files chargesheet against ex-Maharashtra home minister Anil Deshmukh’s aides in alleged money laundering case

    राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनिल देशमुख यांनी केलेले १०० कोटींचे वसुली प्रकरण राज्यात चांगलेच गाजले आहे. या प्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहखात्यातील १०० कोटीच्या वसुलीचा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला होता.



    हा प्रश्न विधानसभेत गाजल्यावर महाविकास आघाडी आणि गृहखात्याची अब्रू गेली होती. त्या बरोबर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावर पाणी सोडावे लागले होते.या प्रकरणात देशमुखबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि असिस्टंट कुंदन शिंदे यांचा मोठा सहभाग आहे

    या दोघांवर बार मालकांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप आहे. आता मनी लॉन्ड्रीग प्रकरणी संजीव पालांडे याच्याविरुद्ध अंमलबजावणी (ईडी) संचलनालयाने आरोपपत्र दाखल केले आहे.

    ED files chargesheet against ex-Maharashtra home minister Anil Deshmukh’s aides in alleged money laundering case

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा