• Download App
    ईडी येता घरा, हॉस्पिटलमध्ये पळा; आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली, गोरेगावच्या लाईफ लाइन हॉस्पिटलमध्ये दाखल। ED come home, flee to hospital; Anandrao Adsul's health deteriorated and he was admitted to Life Line Hospital in Goregaon

    ईडी येता घरा, हॉस्पिटलमध्ये पळा; आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली, गोरेगावच्या लाईफ लाइन हॉस्पिटलमध्ये दाखल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सिटी बँकेच्या ९०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली येथील घरावर सकाळी कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीची टीम सकाळी सहाच्या सुमारास आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवली पूर्व कदमगिरी घरावर पोहोचली. 4 तासांहून अधिक काळ आनंदराव अडसूळ यांची चौकशी करण्यात येत होती. ED come home, flee to hospital; Anandrao Adsul’s health deteriorated and he was admitted to Life Line Hospital in Goregaon



    ईडीचे चार अधिकारी आनंदराव अडसूळ यांच्या घरी पोहोचले होते. या चौकशी दरम्यान आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली असून गोरेगाव येथील लाईफ लाइन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. ईडीची नोटीस आल्यावर राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांची देखील तब्येत अशीच बिघडली होती. ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते.

    रवी राणांची तक्रार

    फेब्रुवारी महिन्यात अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुंबईतील ईडी कार्यालयात जाऊन आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 91 हजार खातेदारांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी अडसूळ यांच्यावर केला होता. 900 कोटी रुपयांच्या या घोटाळ्यासंदर्भात अडसूळ व त्यांचे पीए सुनील भालेराव यांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली होती. या दोघांच्या नावावर असलेली बेनामी संपत्ती जप्त करुन ईडी व सीबीआयतर्फे चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही या तक्रारीतून करण्यात आली होती.

    ED come home, flee to hospital; Anandrao Adsul’s health deteriorated and he was admitted to Life Line Hospital in Goregaon

    हत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस