• Download App
    अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी आणि मुला विरुद्ध ईडी आणि पुणे पोलिसात तक्रार, जमीनमालकाच्या मृत्यूनंतर कुलमुखत्यार पत्राचा वापर करून जागा बळकावली |ED and Pune police lodge complaint against actor Shatrughan Sinha's wife and son, seize space using power of attorney lette

    अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी आणि मुला विरुद्ध ईडी आणि पुणे पोलिसात तक्रार, जमीनमालकाच्या मृत्यूनंतर कुलमुखत्यार पत्राचा वापर करून जागा बळकावली

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : कुलमुखत्यारपत्र करून दिलेल्या जमीनमालक व्यक्तीचा मृत्यू झाल्यावरही तो जिवंत असल्याचे दाखवून वाघोली (ता. हवेली ,जिल्हा पुणे) येथील जमीन (गट क्रमांक १३३१/१ क्षेत्र १ हेक्टर आणि ५५ आर ) स्वतः व साथीदार यांचे नावावर करून जागा बळकावल्याच्या प्रकरणात प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा ED and Pune police lodge complaint against actor Shatrughan Sinha’s wife and son, seize space using power of attorney lette

    यांच्या पत्नी पूनम सिन्हा, पुत्र कुश सिन्हा यांच्याविरोधात सक्त वसुली संचालनालय (ईडी) , पुणे पोलीस परिमंडळ 2 उपायुक्त सागर पाटील व सहायक पोलीस आयुक्त, लष्कर उपविभाग यशवंत गवारी यांच्याकडे जमीनमालक संदीप दाभाडे यांनी कागदोपत्री पुराव्यांसह तक्रार केली आहे. जमीनमालक संदीप दाभाडे यांनी सोमवारी पत्रकाद्वारे माध्यमांना याबाबाबतची माहिती दिली.



    संदीप दाभाडे यांनी रविवारी ईमेल द्वारे बंडगार्डन पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे ही तक्रार पाठवली. स्वतः बंडगार्डन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानकर यांनी रविवारी सायंकाळी ही तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याने सोमवारी सकाळी दाभाडे यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र. २ सागर पाटील व सहायक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग यशवंत गवारी यांची भेट घेतली.

    तक्रारी दिल्या आणि पोहोच घेतली. याचप्रमाणे सर्व कागदोपत्री पुराव्यासह सक्तवसुली संचालनालय ( Enforcement Directorate ) येथे ईमेल द्वारे तक्रार दिली.संदीप दाभाडे यांच्या वडिलोपार्जित जमीनीचे कुलमुखत्यारपत्र त्यांचे पिता गोरखनाथ दाभाडे यांनी पूनम शत्रुघ्न सिन्हा, कुश सिन्हा यांना २००२, २००४ मध्ये करून दिले होते. गोरखनाथ दाभाडे सन २००७ साली मृत झाल्यावर ते कुलमुखत्यार पत्र कायदेशीररित्या गैरलागू ठरत होते.

    संदीप दाभाडे आणि त्यांचे भाऊ बहिण हे वडिलोपार्जित संपत्तीचे आधीच मालक होते. वडील वारल्यानंतर त्याचा वारस हक्क सुद्धा मिळत होता. वडिलोपार्जित संपत्तीचे संदीप दाभाडे व भाऊ बहिण हे मालक असतांनाही त्यांची परवानगी न घेता व गोरखनाथ दाभाडे मृत झाल्यानंतर देखील ते जिवंत असल्याचे घोषणापत्र आणि प्रतिज्ञापत्र सन २००९, २०१० मध्ये तयार करून दिले.

    त्याचा उपयोग करून पूनम शत्रुघ्न सिन्हा, कुश सिन्हा यांनी स्वतःचे व साथीदारांच्या नावे त्या जमिनीचे विक्रीपत्र नोंदवले. दुय्यम निबंधक हवेली- ११ यांचे कार्यालयात हे विक्रीपत्रे नोंदविताना मयत गोरखनाथ दाभाडे यांच्या वतीने कबुलायात सुद्धा पूनम शत्रुघ्न सिन्हा व इतर यांनी दिली आणि स्वाक्षऱ्या सुद्धा केल्या.

    ७/१२ वर फेरफार करतांना महसूल विभागाने त्याच्या नोटिसा दाभाडे कुटुंबियांना दिल्या नाहीत व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून, राजकीय लागेबांधे वापरून पूनम शत्रुघ्न सिन्हा, कुश सिन्हा व त्यांच्या साथीदारांनी स्वतःच्या नावे जमीन करून घेतली . यातील ६० हजार चौरस फूट जमीन सन २००२ -२००४ पासून त्यांनी बेकायदेशीरपणे मर्सिडिस कंपनीला शो रूम साठी भाडे कराराने दिली असून सिन्हा कुटुंबीय त्याचे घेत भाडे घेत असल्याचा आरोप दाभाडे यांनी केला आहे.

    बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मानकर यांना वारंवार विनंती करून सुद्धा त्यांनी तक्रारीतील मोठी नावे पाहून तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. दाभाडे यांनी पोलीस नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून ही माहिती दिल्यावरही हालचाल झाली नाही. अखेर दाभाडे यांनी सोमवारी सकाळी सहायक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांना भेटून तक्रार दिली. याप्रकरणी ईडीकडे देखील तक्रार केल्याची माहिती संदीप दाभाडे यांनी पत्रकाद्वारे दिली.

    ED and Pune police lodge complaint against actor Shatrughan Sinha’s wife and son, seize space using power of attorney lette

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!