प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे मावळते खासदार संजय राऊत यांची संपत्ती सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने जप्त केली आहे, ती प्रत्यक्षात कोणत्या कायदेशीर कारवाई खाली जप्त केली आहे, याचा खुलासा गोरेगावच्या 1034 रुपयांच्या कोटी रुपयांच्या पत्राचार घोटाळ्यात होतो आहे. या पत्राचाळ घोटाळा नेमका आहे तरी काय हे लक्षात घेतले तर संजय राऊत यांची संपत्ती ईडीने कशी जप्त केली आहेत हे लक्षात येते.ED action of confiscation of assets of Sanjay Raut in Goregaon 1034 crore correspondence scam
- ईडीने संजय राऊत यांचे निकटवर्ती मित्र प्रवीण राऊत यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्यात अटक केली होती. त्यांच्यावर कोर्टात आरोपपत्र देखील दाखल केले आहे त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले आहे.
- प्रवीण राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात 55 लाख रुपये गेले होते. जे 10 वर्षानंतर इन्कम टॅक्स सलाब परत करण्यात आले. प्रवीण राऊत यांच्या अटकेनंतर ईडीने सुजित पाटकर यांच्या घरीही छापा टाकला होता आणि पाटकर यांची कशीही केली होती.
- प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र आहेत, तर एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्याशी संबंधित असलेल्या वाधवान कुटुंबियांशीसुद्धा त्यांची जवळीक आहे. प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळ्याचे 90 कोटी रुपये हडपले, असा संशय ईडीला आहे.
- प्रवीण राऊत यांची कंपनी गुरुआशिष कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांचा व्यवहार एचडीआयएलसोबत होता. या व्यवहारामुळेच प्रवीण राऊत यांची एचडीआयएल कंपनीशी संबंध वाढले. प्रवीण राऊत यांचा एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्यात सहभाग असल्याची खात्री ईडीला आहे.
- प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळ्याचे 90 कोटी रुपये हडपले, असा संशय ईडीला आहे. प्रवीण राऊत यांची कंपनी गुरुआशिष कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांचा व्यवहार एचडीआयएलसोबत होता. या व्यवहारामुळेच प्रवीण राऊत यांची एचडीआयएल कंपनीशी संबंध वाढले. प्रवीण राऊत यांचा एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्यात सहभाग असल्याची खात्री ईडीला आहे
ED action of confiscation of assets of Sanjay Raut in Goregaon 1034 crore correspondence scam
महत्त्वाच्या बातम्या
- Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भाषणाचे कर्नाटकात पडसाद; मशिदींवरील भोंग्यांवर बंदीची हिंदुत्ववाद्यांची मागणी!!
- Sanjay Raut ED Action : संजय राऊतांची मुंबईतला फ्लॅट आणि अलिबागमधली जमीन ईडीकडून जप्त!!
- Congress Ahmad Patel : अहमद पटेलांचा मुलगा फैजल काँग्रेस हायकमांड वर नाराज; वाटचाल “आप”च्या दिशेने!!
- लष्करी शेती अन् दुग्धशाळा आता होणार इतिहासात जमा; शेकटकर समितीने केली होती शिफारस