• Download App
    एकनाथ खडसेंवर ईडीची मोठी कारवाई; मनी लाँड्रींग प्रकरणी ५.७३ कोटींची मालमत्ता जप्त; जळगाव, लोणावळ्यातल्या मालमत्तेवर कारवाई । ED Action Against Eknath Khadse Assets

    एकनाथ खडसेंवर ईडीची मोठी कारवाई; मनी लाँड्रींग प्रकरणी ५.७३ कोटींची मालमत्ता जप्त; जळगाव, लोणावळ्यातल्या मालमत्तेवर कारवाई

    वृत्तसंस्था

    मुंबई : भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ईडीने खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे. ED Action Against Eknath Khadse Assets

    ईडीने एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई करत ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची ईडी चौकशी करीत आहे. एका प्रकरणात खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसेंवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

    एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात एकनाथ खडसेंची चौकशी केली जात असतानाच ही कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे.



    ईडी’च्या आरोपानुसार २०१६ मध्ये महसूलमंत्री असताना खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील एक भूखंड विकत घेतला. या भूखंडाचा बाजारभाव ३१ कोटी रुपये असताना गिरीश यांनी तो अवघ्या तीन कोटी रुपयांना विकत घेतला. हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा होता. इतक्या कमी किंमतीत व्यवहार कसा काय झाला? गिरीश यांनी तो विकत घेण्यासाठी गोळा के लेल्या तीन कोटी रुपयांचा स्रोत काय? या मुद्यांवर ‘ईडी’चा तपास सुरू केला होता.

    भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. खडसे यांच्या जावयाला ईडीकडून करण्यात आलेली असून, सध्या त्यांची चौकशी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी खडसेंसंदर्भातील झोटिंग समितीचा गोपनीय अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान हा अहवाल सापडला असून या अहवालात एकनाथ खडसेंनी पदाचा गैरवापर केल्याचे म्हटले होते.

    ED Action Against Eknath Khadse Assets

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस