• Download App
    राजधानी एक्सप्रेसमध्ये इकॉनॉमी डबे लावणार : भारतीय रेल्वेच्या वतीने प्रवाशांना दिलासा, ऑक्टोबरपासून सेवा कार्यान्वित होण्याची शक्यता|Economy coaches to be installed in Rajdhani Express Relief to passengers on behalf of Indian Railways, service is likely to be operational from October

    राजधानी एक्सप्रेसमध्ये इकॉनॉमी डबे लावणार : भारतीय रेल्वेच्या वतीने प्रवाशांना दिलासा, ऑक्टोबरपासून सेवा कार्यान्वित होण्याची शक्यता

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाच्या वतीने, प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबरपासून रेल्वे विभागाच्या वतीने, 50 ट्रेनमध्ये AC-3 इकॉनॉमी कोच बसविण्याची तयारी करित आहे. यापैकी 14 राजधानी एक्सप्रेस एकट्या भोपाळमधून जाणाऱ्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना कमी खर्चात लक्झरी सुविधा असलेल्या रेल्वेमधून प्रवास करण्याचा लाभ मिळणार आहे.Economy coaches to be installed in Rajdhani Express Relief to passengers on behalf of Indian Railways, service is likely to be operational from October

    देशभरातील रेल्वे प्रवाशांना ही आनंदाची बातमी आहे. प्रवाशांना आता कमी किमतीत एसी कोचमधून प्रवास करण्याचा अनुभव घेता येणार आहे. रेल्वेने आपत्कालीन कोट्यात दिलेल्या तीन बर्थचाही या योजनेत समावेश केला जाणार आहे. रेल्वे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या गाड्यांमध्ये AC-3 इकॉनॉमी कोच बसवले जाणार त्यामध्ये आरक्षणासोबतच प्रवाशांना विशेष सुविधा मिळणार आहेत.



    या गाड्यांना लागणार इकॉनॉमी डबे

    लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्यांमधील इकॉनॉमी डब्ब्यांची संख्या वाढवण्यात येत आहे. आता स्लीपर क्लासचे डबे एसी-3 इकॉनॉमीमध्ये बदलण्याची तयारी रेल्वेकडून सुरू आहे.

    राजधानी भोपाळमधून या गाड्यांचा समावेश

    भोपाळ-जयपूर एक्सप्रेस, तेलंगणा एक्सप्रेस, जीटी एक्सप्रेस, कर्नाटक एक्सप्रेस, एपी एक्सप्रेस, केरळ एक्सप्रेस, दक्षिण एक्सप्रेस, समता एक्सप्रेस, छत्तीसगड एक्सप्रेस, अमरकंटक एक्सप्रेस, अमृतसर एक्सप्रेस, सचखंड एक्सप्रेस, अंदमान एक्सप्रेस, हिमसागर एक्सप्रेससह त्रिशूर एक्सप्रेस यांचा समावेश आहे.
    रेल्वे विभागाच्या वतीने सांगण्यात आले की, ज्या गाड्यांमध्ये इकॉनॉमी क्लासचे एसी-३ कोच बसवले जाणार आहेत. त्या गाड्यांच्या आरक्षण सीआरआयएसच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. 2024 च्या अखेरीस देशभरातील 67 टक्के ट्रेनमध्ये पहिल्या टप्प्यात स्लीपर कोचचे AC-3 इकॉनॉमी कोचमध्ये रूपांतर करण्याचे भारतीय रेल्वेचे उद्दिष्ट आहे.

    राजधानी एक्सप्रेस बाबत हे जरूर वाचा…

    राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. राजधानी एक्सप्रेस नावाने धावणाऱ्या जलदगती रेल्वेगाड्या भारताची राजधानी नवी दिल्ली आणि इतर राज्यांच्या राजधानीच्या शहरांसोबत जोडतात. 1969 सालापासून सुरू असलेली राजधानी एक्सप्रेस भारतीय रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठेच्या रेल्वेपैकी एक मानली जाते. सर्व राजधानी एक्सप्रेस गाड्या जलदगती असून त्यांचे डबे विशेष आरामदायक असतात. सर्व डबे वातानुकुलीत असतात व प्रवासादरम्यान खान-पान सेवेचे शुल्क भाड्यामध्येच समाविष्ट केलेले असते.

    Economy coaches to be installed in Rajdhani Express Relief to passengers on behalf of Indian Railways, service is likely to be operational from October

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस