• Download App
    किरीट सोमय्यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस; उद्या हजर राहण्याची चिकटवली नोटीस!! Economic Crime Branch police at Kirit Somaiya's house

    Kirit Somaiya : किरीट सोमय्यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस; उद्या हजर राहण्याची चिकटवली नोटीस!!

    प्रतिनिधी

    मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या घरी आज दुपारी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस येऊन धडकले. किरीट सोमय्या त्यावेळी घरात नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरावर उद्या चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी चिकटवली आहे. अशीच नोटीस नील सोमय्या यांच्या घरावर देखील चिकटण्यात आली आहे.Economic Crime Branch police at Kirit Somaiya’s house

    भारतीय युद्ध नौका विक्रांत बचाव मोहिमेचे पैसे नेमके गेले कुठे??, याविषयी तक्रार दाखल झाल्यानंतर ठाकरे – पवार सरकारने पोलिसांना ऍक्टिव्हेट केले आहे. किरीट सोमय्या यांचा तपास आणि चौकशी महाराष्ट्र पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली आहे.



    किरीट सोमय्या गेल्या दोन दिवसापासून नॉटरिचेबल असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. या पार्श्‍वभूमीवर आज सकाळीच किरीट सोमय्या यांनी एका व्हिडिओद्वारे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विक्रांत वाचवण्यासाठी प्रतीकात्मक आंदोलनातून 11 हजार रुपये गोळा करण्यात आले. ते राज्यपालांना दिले आहेत. आपल्यामध्ये पोलिसी चौकशीचा ससेमिरा लावल्याने आपण थांबणार नाही. ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढणारच, असा इशारा किरीट सोमय्या यांनी यावेळी दिला आहे.

    या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस यांच्या घरी पोहोचले. सोमय्या घरी नसल्यामुळे त्यांनी घराच्या दरवाजावर सोमय्या यांना उद्या पोलिस चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

    Economic Crime Branch police at Kirit Somaiya’s house

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!