Earthquake in Nashik : नाशिक जिल्ह्यात गुरुवारी दुपारी जोरदार हादरे जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार हा भूकंप दुपारी 2.38 वाजता आला. हा भूकंप नाशिकच्या पश्चिमेस 95 किमी अंतरावर झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.5 मोजण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तीन किलोमीटरच्या आत असल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्ता हानी झाल्याची माहिती नाही. Earthquake in Nashik Maharashtra measured 3.5 on ricter scale
वृत्तसंस्था
नाशिक : नाशिक जिल्ह्यात गुरुवारी दुपारी जोरदार हादरे जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार हा भूकंप दुपारी 2.38 वाजता आला. हा भूकंप नाशिकच्या पश्चिमेस 95 किमी अंतरावर झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.5 मोजण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तीन किलोमीटरच्या आत असल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्ता हानी झाल्याची माहिती नाही.
तत्पूर्वी, महाराष्ट्रातील पालघरमध्ये गुरुवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या मते, हा भूकंप सकाळी 8:46 वाजता झाला आणि या भूकंपाची तीव्रता 2.9 रिश्टर स्केलवर मोजण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या 5 किमीच्या आत होता. पालघरमध्ये झालेल्या या भूकंपात कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही.
भूकंप का होतो?
पृथ्वी अनेक स्तरांमध्ये विभागली गेली आहे आणि जमिनीखाली अनेक प्रकारच्या प्लेट्स आहेत. या प्लेट्स एकत्र अडकल्या आहेत, परंतु काही वेळा या प्लेट्स घसरतात, ज्यामुळे भूकंप होतो. कधीकधी अधिक कंप होते आणि त्याची तीव्रता वाढते.
भारतात पृथ्वीच्या आतील थरांमध्ये भौगोलिक हालचालीच्या आधारे काही झोन निश्चित केले गेले आहेत आणि काही ठिकाणी ते अधिक आणि काही ठिकाणी कमी आहेत. या शक्यतांच्या आधारावर, भारताला 5 झोनमध्ये विभागले गेले आहे, यावरून भारतात कुठे सर्वाधिक भूकंपाचा धोका आहे हे कळते. या झोन-5 मध्ये भूकंप होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यापेक्षा 4, 3 झोनमध्ये कमी आहे.
Earthquake in Nashik Maharashtra measured 3.5 on ricter scale
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर, सरकारकडून लेखी आश्वासनावर ठाम; आपत्कालीन रुग्णसेवा पुरवणार
- Farmers Protest : तुम्ही शहराचा श्वास कोंडत आहात, लोकांनी व्यवसाय बंद करावेत का?, सर्वोच्च न्यायालयाने किसान महापंचायतीला फटकारले
- Happy Birthday President : राष्ट्रपती कोविंद यांचा जन्मदिन, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही केली वकिली, यूपीतून या पदावर पोहोचणारे पहिले
- आजपासून गॅस सिलिंडरचे दरामध्ये वाढ, नवीन ऑटो डेबिट पेमेंट सिस्टिम; १ ऑक्टोबरपासून लागू झाले हे ६ मोठे बदल
- अफझलखान वधाच्या पोस्टरवरून झालेल्या मिरज दंगलीचा खटला ठाकरे- पवार सरकारकडून मागे; १०६ जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता