विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : असं म्हणतात की कोल्हापूर हे नेहमीच काळाच्या एक पाऊल पुढे राहणारं शहर आहे. इथे नवनवीन प्रयोग केले जातात आणि शोधही लावले जातात. तर भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा प्रयोग सुरू आहे.
E-Jeep ran in Kolhapur 70 years ago?
कोल्हापुरातील यशोधन जोशी यांना घरातील जुन्या कागदपत्रांमध्ये एक माहितीपत्रक आढळून आले आणि या माहिती पत्रकामध्ये त्यांना 70 वर्षांपूर्वी प्रदर्शनातील इ जीपची आठवण झाली. फेसबुकवरील ‘आठवणीतले कोल्हापूर’ या पेजवर ह्या इ जीप संबधी माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.
70 वर्षांपूर्वी उद्योगमहर्षी वाय.पी. पोवार यांनी बॅटरीवर चालणारी जीप तयार केली होती. त्यांना पुढील प्रयोगासाठी आर्थिक पाठबळ मिळाले नाही. त्यामुळे या गोष्टींचा प्रचार होऊ शकला नाही आणि जीपमध्ये देखील नवीन पुढील संशोधन होऊ शकले नाही. दख्खनची दौलत नावाचे एक औद्योगिक प्रदर्शन कोल्हापुरात 1950 मध्ये भरले होते. त्यावेळी पोवार यांनी ही 6 व्होल्टच्या बॅटरीवर चालणारी जीप प्रदर्शित केली होती. हे सांगत यशोधन जोशी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
E-Jeep ran in Kolhapur 70 years ago?
महत्त्वाच्या बातम्या
- कॉँग्रेसचा बंगळुरूमधील भंगारवाला देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार, १७०० कोटींहून अधिक संपत्ती, शिक्षण केवळ पाचवी
- मतांनी नव्हे तर लष्कराच्या पाठिंब्याने इम्रान खान सत्तेवर, नवाझ शरीफ यांना भ्रष्टाराचाच्या जाळ्यात अडकविण्याचाही कट
- WATCH : वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हिंगोलीत साकारतेय घनदाट जंगल
- सुप्रिम कोर्ट आदेश पाळत परमबीर सिंहांचे चौकशीत सहकार्य; साडेसहा तास चौकशीत सर्व आरोप फेटाळले!