• Download App
    पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्राचा इतिहास मांडला - अजित पवारDy CM Ajit Pawar paid tribute to Babasaheb Purandare

    पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्राचा इतिहास मांडला – अजित पवार

    प्रतिनिधी

    मुंबई : “ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. Dy CM Ajit Pawar paid tribute to Babasaheb Purandare

    लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे.

    दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

    Dy CM Ajit Pawar paid tribute to Babasaheb Purandare

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस