• Download App
    केंद्राने सहकार मंत्रालय काढले, राष्ट्रवादीला फारच टोचले; अजितदादांनी हेतूंविषयी सवाल विचारले...!!|Dy CM Ajit Pawar objects new central co opration ministry creation by PM Modi govt

    केंद्राने सहकार मंत्रालय काढले, राष्ट्रवादीला फारच टोचले; अजितदादांनी हेतूंविषयी सवाल विचारले…!!

    प्रतिनिधी

    पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारमध्ये नवे सहकार मंत्रालय काढून अमित शहा यांना त्याचे पहिले मंत्री नेमले. त्यांची ही राजकीय खेळी बाकी कोणत्याही पक्षाला नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसलाच जोरात टोचली आहे.Dy CM Ajit Pawar objects new central co opration ministry creation by PM Modi govt

    आधी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्या विषयावर प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त केली. आज पुण्याच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रातल्या सहकार खातेनिर्मितीच्या हेतूंवर शंका उपस्थित केली.



    अजित पवार म्हणाले की, केंद्रात सहकार खाते सुरु करण्यामागे त्यांचा हेतू काय, त्यामागे वेगवेगळे कंगोरे असू शकतात. त्यातून ते काय करू पाहत आहेत ते त्याबाबत नियम बनवल्यानंतरच समजेल. मध्यंतरी शेतकऱ्यांविरोधातील कायद्यांची अंमलबजावणी करण्यात आली.

    त्यानंतर आठ महिन्यांपासून देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारने त्या संदर्भात तीन बिले आणली आहेत. पण जनतेसाठी ती बिले ठेवलेली आहेत.

     खरेतर केंद्राने केंद्र सरकारचे काम करावे. राज्याने राज्याचे काम करावे. जसे संरक्षण मंत्रालय हे केंद्राच्याच हातात पाहिजे. राज्य त्याचे वेगळे खाते सुरू करू शकत नाहीत. तशाप्रकारे त्यांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे, असे अजित पवारांनी मत व्यक्त केले.

    सहकार हे राज्याच्या अखत्यारितील खाते आहे. राज्यानेच त्याबद्दल पाहावे. केंद्राच्या हातात मल्टिस्टेट सोसायट्या, मल्टिस्टेट कारखाने आणि बँका असतात. पण संपूर्ण देशाचा विचार करता सहकार चळवळ ही सगळ्यात जास्त महाराष्ट्रात फोफावलेली आहे.

    सहकार चळवळ महाराष्ट्रात रुजून वाढली आहे. या क्षेत्रात काही चुकीचे लोक आहेत. पण काही चुकीच्या लोकांमुळे संपूर्ण सहकार क्षेत्र चुकीचे आहे, असे समजण्याचे अजिबात कारण नाही, अशी मखलाशी अजितदादांनी केली.

    Dy CM Ajit Pawar objects new central co opration ministry creation by PM Modi govt

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य