vaccination in Maharashtra : देशात सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या हाताबाहेर गेलेली आहे. यामुळे रुग्णालयांतील बेड, रेमडेसिव्हिर औषधी, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा आवश्यक सुविधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने या समस्येच्या निराकरणासाठी तातडीने महत्त्वाचे निर्णय घेत विविध उपाययोजना राबवल्या आहेत. याच जोडीला कोरोनावर सर्वात प्रभावी असलेले शस्त्र म्हणजेच लसीकरणालाही वेग देण्याचा प्लॅन आखला आहे. Dy CM Ajit Pawar interaction with media on vaccination in Maharashtra in pune today
विशेष प्रतिनिधी
पुणे : देशात सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या हाताबाहेर गेलेली आहे. यामुळे रुग्णालयांतील बेड, रेमडेसिव्हिर औषधी, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा आवश्यक सुविधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने या समस्येच्या निराकरणासाठी तातडीने महत्त्वाचे निर्णय घेत विविध उपाययोजना राबवल्या आहेत. याच जोडीला कोरोनावर सर्वात प्रभावी असलेले शस्त्र म्हणजेच लसीकरणालाही वेग देण्याचा प्लॅन आखला आहे. 1 मेपासून देशभरात 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची मुभा देण्यात आली आहे. परंतु ही लस मोफत मिळेल की नाही, याबाबत नागरिकांमध्ये अजूनही संभ्रमाची स्थिती आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने, मध्य प्रदेशच्या चौहान सरकारने आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनीही आपापल्या राज्यांत 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याचे जाहीर केले आहे. परंतु महाराष्ट्रात लस मोफत मिळेल की नाही, यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खुलासा केला आहे.
‘सधन नागरिकांनी लस विकतच घ्यावी!’
पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, लसीचा तुटवडा असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटातील सधन नागरिकांना लस विकतच घेण्याचे आवाहन केलं आहे. त्यासोबतच राज्यातील गरीब आणि अतिगरीब जनतेला मोफत लस देण्यासंदर्भात राज्य सरकारचा विचार सुरू असून लवकरच त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असेही राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनी यासंदर्भातला निर्णय घेण्यात येईल.
मोफत लसीबाबत मुख्यमंत्री 1 मेला जाहीर करणार भूमिका
अजित पवार म्हणाले की, “मोफत लसीबाबत राज्याचे मुख्यमंत्री १ मे रोजी भूमिका जाहीर करणार आहेत. तेव्हाच त्याबद्दल सांगितलं जाईल. सीरमच्या पूनावालांनी म्हटलंय की, सध्या मी तुम्हाला एवढ्या लस देऊ शकणार नाही. त्यांनी सांगितलं की, माझ्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला लस देईन. उरलेली लस तुम्ही इतर कंपन्यांकडून घ्या. सध्या ते इंग्लंडला गेले आहेत. ते परत आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलू,” असंही त्यांनी सांगितलं.
लसींसाठी ग्लोबल टेंडर काढणार राज्य सरकार
लसीकरणाची गरज पूर्ण करण्यासाठी केंद्राने राज्यांना आता लस थेट विकत घेण्याची परवानगी दिली आहे. यामुळे आता राज्य सरकार करोनावरील ज्या काही लसींना देशात मान्यता मिळालेली आहे, त्या लसींच्या पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार आहे. यासाठी राज्य सरकारतर्फे 5 सदस्यांची समिती नेमण्यात येणार असून राज्याचे मुख्य सचिव समितीचे अध्यक्ष असतील. 1 मेपासून त्यादृष्टीने कार्यवाही सुरू होईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Dy CM Ajit Pawar interaction with media on vaccination in Maharashtra in pune today
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्राने पाळला शब्द : महाराष्ट्राला रेमडेसिव्हिरचा सर्वाधिक पुरवठा, दहा दिवसांसाठी 4 लाख 35 हजार इंजेक्शन्स
- धक्कादायक! दारूची तल्लफ जिवावर उठली, सॅनिटायझर प्यायल्याने यवतमाळमध्ये 7 मजुरांचा मृत्यू
- जबरदस्त : कोव्हॅक्सिन खऱ्या अर्थाने बनले स्वदेशी, कच्च्या मालासाठी अमेरिकीची गरज नाही, उत्पादनही वार्षिक 70 कोटी डोस जगात सर्वाधिक
- 22 मंत्र्यांनी तक्रार करूनही दखल नाहीच, डॉ. व्यास यांना कुणाचे अभय?, आरोग्यमंत्री टोपेंनीही टेकले हात, खात्याचा सचिवही बदलता येईना
- लसीच्या दरांबद्दलच्या सर्व शंका केंद्र सरकारने केल्या दूर, 150 रुपयांत लस घेऊन राज्यांना पुढेही मोफतच देणार