• Download App
    दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड; ठाकरे गट आक्रमक; सुनील राऊत म्हणाले, 24 तासात जशास तसं उत्तर देऊ Dutta Dalvis car vandalized

    दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड; ठाकरे गट आक्रमक; सुनील राऊत म्हणाले, 24 तासात जशास तसं उत्तर देऊ

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईचे माजी महापौर तथा ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर, ठाकरे आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. Dutta Dalvi’s car vandalized; Thackeray group aggressive; Sunil Raut said, we will give an answer as soon as possible within 24 hours

    दत्ता दळवी यांना अटक केल्यानंतर, त्यांना न्यायालयाने कोठडी सुनावली. तर सायंकाळी पुन्हा दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड झाली आहे. चार तरुणांनी येऊन दत्ता दळवी यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. या तोडफोडीनंतर ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तोडफोड करणाऱ्यांची नावं आम्हाला समजली आहेत, येत्या 24 तासांत आम्हीही जशास तसे उत्तर देऊ, असे सुनील राऊत म्हणाले.

    हे काम शिंदे गटाचे

    ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवींच्या गाडीची तोडफोड करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आता ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत म्हणाले की, हे काम शिंदे गटाचे आहे. त्यांच्यात समोर येण्याची धमक नसल्याने मागून असा भ्याड हल्ला केला आहे. या लोकांची ओळख पटली असून त्यांच्यावर जर पोलिसांनी कारवाई केली नाहीत तर येत्या 24 तासात त्यांना उत्तर देऊ. गाडी फोडणाऱ्यांच्या घराच्या काचाही शिल्लक राहणार नाहीत.

    दत्ता दळवी काय म्हणाले होते

    भांडुपमध्ये रविवारी 26 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा कोकण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात माजी महापौर आणि उपनेते दत्ता दळवी यांचं भाषण झालं. यावेळी दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं. स्वत:ला हिंदूहृदयसम्राट म्हणून घेतात, अरे भोसxx तुला हिंदूहृदयसम्राटचा अर्थ माहिती आहे का? आज आनंद दिघे असते तर एकनाथ शिंदे यांना चाबकाने फोडून काढलं असतं, असं दत्ता दळवी म्हणाले होते.

    दत्ता दळवी यांना पोलीस कोठडी

    दत्ता दळवी यांच्या वक्तव्यानंतर त्यांना बुधवारी 29 नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता भांडुप पोलिसांनी विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक केली. भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांना कोर्टात हजर केलं असता कोर्टाने दत्ता दळवी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवली.

    Dutta Dalvis car vandalized; Thackeray group aggressive; Sunil Raut said, we will give an answer as soon as possible within 24 hours

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!