प्रतिनिधी
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने लावण्यात आलेल्या तैलचित्रावरुन भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुम्ही 2.5 वर्षे मुख्यमंत्री असताना स्वत:च्या पिताश्रींचे तैलचित्र लावू शकला नाहीत, असे म्हणत तुम्ही टीका करत राहा आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, असा टोला दरेकर यांनी उद्वव ठाकरे यांना लगावला आहे. During two and a half years as Chief Minister, Pitashree’s oil painting could not be installed
प्रवीण दरेकर टीका करताना म्हणाले की, मला वाटते अजूनही सुधारायचे काही लक्षण दिसत नाही. गद्दार- गद्दार, खोके-खोके यांच्या पलीकडे ठाकरेंना काही दिसत नाही. शिंदे साहेब याच्या कौसो मैल दूर निघून गेले आहेत. तु्म्ही अडीच वर्षात महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे. पंचवीस वर्षांत मुंबईची वाट लावली आहे. त्यामुळे आता आम्हाला विकास करायचा आहे. तुमच्या टीका टिप्पणीवर आम्ही लक्ष देत नाही, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
Uddhav Thackeray : योगींनी भोंगे उतरवले, पण हे काम हिंदुत्वाचे नाही, तर धर्मनिरपेक्षतेचे!!
हिंदुत्वाचा विचार काॅंग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलाय
उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते, मात्र त्यांना आपल्याचा पिताश्रींचे तैलचित्र लावता आले नाही. मी बोरवलीतून हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मैदानाचे उद्धाटन करुन आलो आहे. ते तुम्हाला का जमले नाही, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. तुम्ही हिंदुत्वाचा विचार काॅंग्रेसच्या पायाशी गहाण ठेवला आहे, असेही टीकास्त्र दरेकर यांनी ठाकरेंवर डागले.
During two and a half years as Chief Minister, Pitashree’s oil painting could not be installed
महत्वाच्या बातम्या
- बाळासाहेब ठाकरे जयंती : दारातील जोड्यांची श्रीमंती आणि मातोश्रीचा वारसा
- विरोधकांचे ऐक्य वाऱ्यावर तरीही भाजप उत्तर प्रदेशात सर्व 80 जागा गमावण्याचा अखिलेश यादवांचा अजब दावा
- द ग्रेट खली संघ मुख्यालय रेशीमबागेतील सरसंघचालक स्मृतिमंदिरात नतमस्तक
- 20 गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधी उपलब्ध!; असा करा अर्ज
- भारतातल्या पहिल्या कोरोना प्रतिबंधक नेझल लसीचे २६ जानेवारीला लॉंचिंग; किती असणार किंमत?