• Download App
    नवाब मलिक कोर्टात गैरहजर ; पुढील सुनावणी १ जानेवारी रोजी DRUGS CASE: Nawab Malik absent from court; The next hearing is on January 1

    DRUGS CASE : नवाब मलिक कोर्टात गैरहजर ; पुढील सुनावणी १ जानेवारी रोजी

     

    मलिक किंवा त्यांच्यावतीने वकील हजर नसल्याने पुढील सुनावणी १ जानेवारी २०२२ रोजी ठेवण्यात आली.वाशिम जिल्हा न्यायालयाने मलिक यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. DRUGS CASE: Nawab Malik absent from court; The next hearing is on January 1


    विशेष प्रतिनिधी

    वाशिम : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकामागोमाग एक आरोप केले.गेल्या दीड-दोन महिन्यांपासून नवा मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वाद काही थांबायला तयार नाही.

    दरम्यान ‘एनसीबी’चे समीर वानखडे यांचे चुलतभाऊ संजय वानखडे यांनी जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध वाशिम सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर काल (सोमवारी १३ डिसेंबर ) रोजी सुनावणी झाली.



    यावेळी मलिक किंवा त्यांच्यावतीने वकील हजर नसल्याने पुढील सुनावणी १ जानेवारी २०२२ रोजी ठेवण्यात आली.वाशिम जिल्हा न्यायालयाने मलिक यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाचा आदेश घेऊन कुर्ला पोलीस स्टेशनचे कर्मचारी तीन दिवस मलिक यांच्या बंगल्यावर गेले असता ते नसल्याचे सांगण्यात आले.

    मलिक यांनी समीर वानखडे यांच्याविरुद्ध जातीवाचक वक्तव्य केल्याने त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत संजय वानखडे यांनी ॲड. उदय देशमुख यांच्यामार्फत वाशिम न्यायालयात याचिका दाखल केली. यावर काल (१३ डिसेंबरला ) सुनावणी होती.

    DRUGS CASE: Nawab Malik absent from court; The next hearing is on January 1

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!