• Download App
    मुंबईच्या समुद्रात कॉर्डेलिया क्रुजमध्ये ड्रग्स पार्टी , जहाजावर एनसीबीचा छापा , अटक केलेल्या दहा जणांमध्ये बॉलिवूड कलाकाराचा मुलगा Drug party at Cordelia Cruise in Mumbai seas, NCB raid on ship,arrested son of big bollywod celebrities

    मुंबईच्या समुद्रात कॉर्डेलिया क्रुजमध्ये ड्रग्स पार्टी , जहाजावर एनसीबीचा छापा , अटक केलेल्या दहा जणांमध्ये बॉलिवूड कलाकाराचा मुलगा

    विविध प्रकारचे आमली पदार्थ जप्त केले.एनसीबेच जनरल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही कारवाई घडवून आणली आहे.Drug party at Cordelia Cruise in Mumbai seas, NCB raid on ship,arrested son of big bollywod celebrities


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या टीमने मुंबई पोर्टमध्ये कॉर्डेलिया क्रुजमध्ये एक प्रमुख ड्रग कार्टेलला उघडकीस आणले आहे. 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या कारवाईमध्ये एजेंसीला याबद्दल माहिती मिळाली.मुंबईहून गोवा जाणाऱ्या एका शिपमध्ये ड्रग पार्टी होणार आहे. हे समजल्यावर NCB चे काही अधिकारी या जहाजावर प्रवाशी म्हणून गेले.

    मोठी कारवाई करण्यात आली

    एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशी बनून कॉर्डेलिया क्रुजमध्ये प्रवेश केला. दरम्यान या मोठ्या क्रुजवर होणाऱ्या हायप्रोफाईल ड्रग पार्टीच्या आधीच त्यांनी छापेमारी सुरू केली. यामध्ये विविध प्रकारचे आमली पदार्थ जप्त केले.एनसीबेच जनरल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही कारवाई घडवून आणली आहे.



    ते आपल्या टीमसोबत मुंबईमधील क्रुजमध्ये सामिल झाले होते.ड्रग्सची पार्टी केल्याप्रकरणी एनसीबीने दहा जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये बॉलिवूडच्या एका बड्या कलाकाराचा मुलगा असल्याचे वृत्त आहे.

     

     

     

    कंपनीचे प्रेसिडेंट आणि सीईओ जरगेन बेलम यांनी मागितली प्रवाशांची माफी

    यावेळी कंपनीचे प्रेसिडेंट आणि सीईओ जरगेन बेलम यांनी म्हटले आहे की, नॉर्कोटिक्स डिपार्टमेंटने काही प्रवाशांकडून ड्रग जप्त केले आहेत. या प्रवाशांना तत्काळ क्रुजमधून बाहेर काढण्यात आले आहे. या घटनाक्रमामुळे आमच्या सेलवर परिणाम झाला आहे. या प्रवाशांमुळे आमची क्रुज उशीरा निघाली. त्यामुळे इतर प्रवाशांची आम्ही माफी मागतो.

    एनसीबीने अटक केलेल्या दहा जणांना मुंबईत आणून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. जहाजावरील ड्रग्स पार्टीचे आयोजन दिल्लीच्या एका कंपनीने केल्याची माहिती आहे . या कंपनीने पार्टीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाकडून ८० हजार रुपये घेतले होते.

    एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले की आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा या आठ जणांची मुंबई किनारपट्टीवरील एका क्रूझवर कथित रेव्ह पार्टीवर केलेल्या छाप्याशी संबंधित चौकशी केली जात आहे.सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी RTPCR या कोडवर्डचा वापर करण्यात आला होता.

    काही दिवसांपूर्वी एनसीबीने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याच्या गर्लफ्रेंडचा भाऊ डेमेट्रियड्स याला अटक केली होती. त्याच्याकडून साइकोट्रॉपिक पदार्थ जप्त करण्यात आले होते. यावेळी झालेल्या चौकशीतून जहाजावर होणार असलेल्या पार्टीची माहिती मिळाली. या मिळालेल्या माहितीचा आधार घेत एनसीबीने सापळा रचून ही कारवाई केली.

    Drug party at Cordelia Cruise in Mumbai seas, NCB raid on ship,arrested son of big bollywod celebrities

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल