• Download App
    नगर शहरातील 16 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू; तोकड्या अंग प्रदर्शनी, अशोभनीय कपड्यांवर बंदी!! Dress code enforced in 16 temples in the city

    नगर शहरातील 16 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू; तोकड्या अंग प्रदर्शनी, अशोभनीय कपड्यांवर बंदी!!

    प्रतिनिधी

    नगर : महाराष्ट्रात नागपूर, अमरावती नंतर आता नगर शहरातील ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरासह 16 मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि संबंधित मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला आहे. नगर येथील पत्रकार परिषदेत महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी ही माहिती दिली. Dress code enforced in 16 temples in the city

    येत्या महिनाभरात जिल्ह्यातील 500 मंदिरात व दोन महिन्यात संपूर्ण जिल्ह्यातील मंदिरात ही वस्त्रसंहिता लागू करण्याचे महासंघाचे प्रयत्न आहे. त्यासाठी मंदिर रक्षा समितीची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

    भाविकांनी अंगप्रदर्शन करणारे, उत्तेजक, तोकडे, असभ्य अशोभनीय (फाटकी जिन, स्कर्ट) कपडे घालून मंदिरात प्रवेश करू नये. अशा भाविकांना मंदिराचे विश्वस्त नम्रपणे नकार देतील. मंदिराचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार संस्कृती जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे घनवट म्हणाले. यावेळी मंदिरांचे विश्वस्त अभय आगरकर, पंडितराव खरपुडे, प्रतिभा भोंग, ॲड. पंकज खराडे, प्रा. माणिक विधाते, बापू ठाणगे, मिलिंद चवंडके, ॲड. अभिषेक भगत आदी उपस्थित होते.

    राज्य सरकारने सन 2020 मध्ये सरकारी कार्यालयातून वस्त्रसंहिता लागू केली. तसेच देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी आस्थापना, शाळा-महाविद्यालय, पोलिस आदी क्षेत्रात वस्त्रसंहिता लागू आहे. तसेच मंदिरांमध्येही ती लागू असावी, असा उद्देश आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक उज्जैनचे महांकालेश्वर मंदिर, घृष्णेश्वर मंदिर, श्री देव अंमळग्रह मंदिर, अमळनेर), श्री काशी विश्वेश्वर मंदिर (वाराणसी), तिरुपती बालाजी मंदिर (आंध्रप्रदेश), पद्मनाभ स्वामी मंदिर (केरळ), श्री माता मंदिर (कन्याकुमारी) या प्रसिद्ध मंदिरामधून अनेक वर्षांपासून भाविकांसाठी सात्विक वस्त्रसंहिता लागू आहे. गोव्यातील बहुतांश मंदिरांसह बेसिलिका ऑफ बॉर्न जिसस, सी कैथेड्रल चर्चमध्येही वस्त्रसंहिता लागू आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही तेथील मंदिरात प्रवेश करण्यासाठी सात्विक वेशभूषा असली पाहिजे, हे मान्य करून जानेवारी 2016 पासून राज्यात वस्त्रसंहिता लागू केली. मंदिर हे धार्मिक स्थळ आहे, धार्मिकतेला अनुसरून तेथे आचरण व्हायला हवे, असेही घनवट यांनी स्पष्ट केले.

    या 16 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू

    श्री विशाल गणपती मंदिर (माळीवाडा), भवानी माता मंदिर (बुणऱ्हानगर), शनि मारुती मंदिर (दिल्लीगेट), शनि मारुती मंदिर (माळीवाडा), शनि मारुती मंदिर (झेंडीगेट), गणेश राधाकृष्ण मंदिर (मार्केट यार्ड), विठ्ठल मंदिर (पाईपलाईन रस्ता), दत्त मंदिर (पाईपलाईन रस्ता), श्रीराम मंदिर (पवननगर, सावेडी), भवानी माता मंदिर (सबजेल, चौक) रेणुकामाता मंदिर (केडगाव), श्रीराम मंदिर (वडगाव गुप्ता), पावन हनुमान मंदिर (वडगाव गुप्ता), संत बाबाजी मंदिर (वडगाव गुप्ता), साईबाबा मंदिर (केडगाव), खाकीदास बाबा मंदिर (लालटाकी).

    Dress code enforced in 16 temples in the city

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप; नागपूरमधून योजनेला सुरुवात

    Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- राज्यात कुठेही हिंदी लादली जात नाही; भारतीय भाषेला विरोध करून इंग्रजीचे गोडवे गाण्याचे वाईट वाटते