• Download App
    पुण्यात DRDO च्या शास्त्रज्ञाला अटक:पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होता, दहशतवादविरोधी पथकाची कारवाईDRDO Scientist Arrested In Pune: Was In Touch With Pakistani Agents, Anti Terrorism Squad Action

    पुण्यात DRDO च्या शास्त्रज्ञाला अटक:पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होता, दहशतवादविरोधी पथकाची कारवाई

    वृत्तसंस्था

    पुणे : पुण्यातील DRDO च्या एका कार्यालयात कार्यरत असलेल्या एका शास्त्रज्ञाला एटीएसने हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. तो व्हॉट्सअ‍ॅप संदेश, व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या ऑपरेटिव्हच्या संपर्कात असल्याचे दहशतवादविरोधी पथकाने (ATS) म्हटले आहे. DRDO Scientist Arrested In Pune: Was In Touch With Pakistani Agents, Anti Terrorism Squad Action

    संवेदनशील माहितीशी तडजोड

    जबाबदार पदावर असूनही, DRDO अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून संवेदनशील सरकारी गुपितांशी तडजोड केली, जी शत्रू राष्ट्राच्या हाती पडल्यास भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो असेही दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) म्हटले आहे.

    गुन्ह्याची नोंद

    महाराष्ट्र पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक, काळाचौकी, मुंबई, यांनी अधिकृत गुप्तता कायदा 1923 च्या कलम 1923 आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास तपास अधिकारी करत असल्याचे पथकाने म्हटले आहे.

    DRDO Scientist Arrested In Pune: Was In Touch With Pakistani Agents, Anti Terrorism Squad Action

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस