विनायक ढेरे
नाशिक : राष्ट्रपतीपदाची निवडणूक यंदा खूपच अनोखी ठरताना दिसत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशात प्रथमच आदिवासी महिला राष्ट्रपती होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातल्या भाजप सरकारच्या प्रोत्साहनाने देशभरातील तब्बल 1.45 लाख आदिवासी गावांमध्ये अनोखे सेलिब्रेशन करण्याची योजना भाजप आणि सहयोगी पक्षांनी आखली आहे. विशेषत: भाजपने यामध्ये मोठा पुढाकार घेतला आहे. Draupadi Murmu : BJP planning celebration in 1.45 lakhs adivasi villages all over India
आदिवासी समुदायासह देशात संदेश
21 जून रोजी अधिकृतरित्या द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड होईल त्या दिवशी फक्त त्यांच्याच भव्य दिव्य पोस्टर्ससह आदिवासी गावांमध्ये मोठा जल्लोष साजरा केला जाईल, अशी व्यवस्था भाजपने केली आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीच्या निमित्ताने संपूर्ण देशभर आदिवासी समुदायात मोठा राजकीय संदेश पोहोचविण्याची ही योजना आहे. देशाच्या इतिहासात आदिवासी महिला सर्वोच्च स्थानावर पोहोचल्याचा तो संदेश असेल. त्याही पेक्षा आदिवासी समुदाय देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात पोहोचल्याचा तो प्रतीकात्मक संदेश असेल.
मराठी माध्यमांची कोती दृष्टी
एकीकडे सगळी मराठी माध्यमे द्रौपदी मुर्मू आपल्या मुंबई दौऱ्यात मातोश्रीवर जाणार का?? की जाणार नाहीत?? उद्धव ठाकरे यांना भेटणार का?? की भेटणार नाहीत?? भेटल्या तर त्या हॉटेल लीला मध्ये भेटतील का?? शिवसेनेचे सर्व खासदार त्यांना स्वतंत्रपणे भेटणार आहेत का??, वगैरे बातम्या देत आहेत.
पठडीबद्ध भेटीच्या पलिकडे
परंतु द्रौपदी या उद्धव ठाकरे यांना भेटल्या अथवा न भेटल्या तरी त्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांच्या या राजकीय पक्षांच्या नेत्यांची पठडीबद्ध भेटी आहेत. त्या होतच असतात. पण त्या पलिकडे जाऊन द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाचे जंगी सेलिब्रेशन करण्याची भाजपने योजना आखली आहे आणि त्याचा राजकीय मेसेज हा सर्वदूर आणि अधिक खोलवर पोहोचणारा दिसतो आहे!!
मराठी माध्यमांमध्ये प्रतिबिंब नाही
याचे प्रतिबिंब मराठी माध्यमांमध्ये फारसे पडलेले दिसत नाही. द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची व्यूहरचना यशवंत सिन्हा हे “आहे रे” गटाचे प्रतिनिधित्व करणारे विरोधकांचे उमेदवार आहेत, तर स्वतः मुर्मू या “नाही रे” गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार आहेत अशी केली आहे. त्यामुळे त्या निवडून आल्यानंतर त्याचे सेलिब्रेशन देखील पारंपारिक राजकीय किंवा पठडीबद्ध पद्धतीने न करता पठडी मोडून संपूर्ण देशभर आणि त्यातही आदिवासी गावांमध्ये करण्याची योजना दिसते आहे. मराठी माध्यमांच्या दृष्टीच्या पलिकडची ही योजना आहे!!
Draupadi Murmu : BJP planning celebration in 1.45 lakhs adivasi villages all over India
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रपतीपद ते मुंबई महापालिका निवडणूक ; शरद पवारांचे टॉक नॅशनली, ॲक्ट लोकली!!
- पाणी – पथदिवे योजनांचा वीजपुरवठा सुरळीत होणार, थकित बिले सरकार टप्प्याटप्प्याने भरणार
- MPSC : नोकरीची संधी; अर्ज करण्यासाठी 14 जुलै शेवटचा दिवस शिल्लक!!
- हमीद अन्सारींचे प्रत्युत्तर : नुसरत मिर्झाला ना मी बोलवले, ना मी त्यांच्याशी बोललो; भाजपकडून चुकीचे आरोप!!