• Download App
    डॉ. सुदाम मुंडेला कठोर शिक्षा झाली असती तर आर्वीची घटना घडलीच नसती; सामाजिक कार्यकर्त्या ज्योती गुरव यांचा दावा|Dr. Sudam Munde would have been severely punished Then the Arvi incident would not have happened; Social activist Jyoti Gurav claims

    डॉ. सुदाम मुंडेला कठोर शिक्षा झाली असती तर आर्वीची घटना घडलीच नसती; सामाजिक कार्यकर्त्या ज्योती गुरव यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव –बीड येथील डॉक्टर सुदाम मुंडे यांना अर्भकांच्या हत्येप्रकरणी कठोरातील कठोर शिक्षा झाली असती तर आज व वर्धा जिल्ह्यातील आर्वी सारख्या गावातील घटना घडली नसती, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या व समुपदेशीका ज्योती गुरव यांनी दिली आहे.Dr. Sudam Munde would have been severely punished Then the Arvi incident would not have happened; Social activist Jyoti Gurav claims

    वर्धा जिल्ह्यातील आर्वी या गावांमध्ये डॉक्टर रेखा कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला होता या ठिकाणी पोलीस तपासणीसाठी गेले असता ११ कवट्या व ५४ हाडे पोलिसांना सापडलेली आहेत.



    त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे, ही घटना नक्कीच टाळता आली असते जर बीड येथील डॉक्टर सुदाम मुंडे यांना अशाच प्रकरणांमध्ये अटक झालेली असून सुद्धा ही त्यांना अजूनही कठोरातील कठोर शिक्षा झाली नाही

    त्यामुळे डॉक्टर असे कृत्य करताना घाबरत नाहीत त्यामुळे डॉक्टर सुदाम मुंडे यांना जर कठोरातील कठोर शिक्षा झाली असती तर आर्वी सारख्या गावातील घटना नक्कीच टळली असती अशी प्रतिक्रिया समुपदेशक ज्योती गुरव यांनी दिली आहे

    Dr. Sudam Munde would have been severely punished Then the Arvi incident would not have happened; Social activist Jyoti Gurav claims

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल