आर्वी येथील कदम रुग्णालयात रेखा कदम या गर्भपात करत होत्या. मात्र,गर्भपात केंद्राची परवनगी ही डॉ. रेखा कदम यांच्या नावावर नसून त्यांच्या सासू डॉ.शैलजा कदम यांच्या नाववर आहे.Dr. Neeraj Kadam was handcuffed in Arvi illegal abortion case in Wardha
विशेष प्रतिनिधी
वर्धा : वर्ध्यातील आर्वी येथे अवैध गर्भपात घटनेने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात एकच खळबळ उडाली.या प्रकरणात अखेर डॉक्टर नीरज कदमला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या चौकशीत आता आणखी नवी माहिती उघड होण्याची दाट शक्यता आहे.आर्वी येथील कदम रुग्णालयात रेखा कदम या गर्भपात करत होत्या. मात्र,गर्भपात केंद्राची परवनगी ही डॉ. रेखा कदम यांच्या नावावर नसून त्यांच्या सासू डॉ.शैलजा कदम यांच्या नाववर आहे.
आर्वीतील त्या रुग्णालयाच्या परिसरात खोदकाम सुरूच, आणखी एक कवटी आढळल्याने खळबळ आतापर्यंत सहा आरोपींना अटक प्रकार उघडीस आल्यानंतर मुलीच्या आई व वडिलांसह गर्भपात करणाऱ्या डॉ. रेखा कदम आणि 2 परिचारिका अशा एकूण 5 जणांना पोलिसांनी अटक केलं होतं.
आता याच प्रकरणात मध्यरात्री डॉ. नीरज कदम यांना पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टर नीरज कदम याला अटक करण्यात आल्याने आता या प्रकरणात अटक झालेल्या एकूण आरोपींची संख्या सहावर पोहोचली आहे. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथील डॉ. कदम याच्या घराच्या आणि हॉस्पिटलची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे.
डॉक्टर कदम याच्या घरी पोलिसांनी झडती घेतली आणि यावेळी तेथून शासकीय गर्भपात करण्याच्या कामात येणारे इंजेक्शन घरी आढळल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर तपासात २५ ते ३० रजिस्टर जप्त केल्याची माहितीही उघड झाली आहे.
Dr. Neeraj Kadam was handcuffed in Arvi illegal abortion case in Wardha
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना होम टेस्टिंग किट घेण्यासाठी आता आधारकार्ड असणे गरजेचे , महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली माहिती
- कोरोना मुळे अमिताभ बच्चनचेही काम बंद
- शिवरायांचा पुतळा अमरावती येथील पुलावरून हटविल्याने तणाव, बेकायदा उभारल्याचा दावा
- ठाण्यात बनावट कोविड प्रमाणपत्र विकणाऱ्या तरुणाला अटक , ७०० रुपयांत बनवायचा बनावट प्रमाणपत्र