प्रतिनिधी
मुंबई : सन 2002 मध्ये गुजरात दंगलीच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांची कारवाई करणे शक्य होते. परंतु त्या वेळचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि आपण टोकाची भूमिका घेऊ नये असा आग्रह धरला, असे राष्ट्रवादीचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज एका मुलाखतीत सांगितले.Dr. Manmohan Singh – Pawar avoids CBI action against Modi
शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त “अष्टावधानी” या ग्रंथाचे प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी शरद पवार यांनी अनेक विषयांवर विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली.
पंतप्रधान ङाॅ. मनमोहन सिंग आणि कृषिमंत्री शरद पवार यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांची कारवाई होऊ नये अशी भूमिका घेतल्याची चर्चा कायम होत असते. यावर शरद पवार यांनी आज मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली.
शरद पवार म्हणाले, हो हे काही अंशी खरे आहे. आम्हा दोघांचेही आग्रही मत होते की आपण सुडाचे राजकारण करता कामा नये. निवडणूक किंवा इतर मतभेद होतात. तेव्हा काय बोलायचे असेल तर ते करू, पण एका चौकटीच्या बाहेर आपण जाता कामा नये, अशी आमची भूमिका होती
आम्ही हे चौकटीच्या बाहेर जाऊ दिले नाही. त्यावेळी काँग्रेसमधल्या आमच्या काही सहकाऱ्यांनी गुजरात सरकारमध्ये मंत्री असलेल्या लोकांविषयी वेगळी आणि टोकाची भूमिका घेतली. आमच्या विचाराशी सुसंगत ती भूमिका नव्हती ही वस्तूस्थिती आहे.
अनिल देशमुखांविरोधात सुडाचे राजकारण
शरद पवार म्हणाले दुर्दैवाने आज जे सुडाचे राजकारण सुरू आहे ते ठीक नाही. अनिल देशमुख मंत्री होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांच्यावर अनेक आरोप झाले त्यातील एकच आरोप आता शिल्लक राहिला आहे ज्यावर विचार करावा लागेल.
तो आरोप म्हणजे त्यांनी त्यांच्या शिक्षण संस्थेला मदत करण्यासाठी कोणत्यातरी एका कंपनीकडून ४ कोटी रुपये घेतले. ती रक्कम शिक्षण संस्थेच्या खात्यात जमा झाली. ती रक्कम सत्तेचा दुरुपयोग करून घेतली असा तो आरोप आहे. पण पैसे शिक्षण संस्थेच्या खात्यात जमा आहे असे तपास यंत्रणाच सांगत आहेत.
आज अनिल देशमुख यांच्याविरोधात 7000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या एका आरोपासाठी 7000 पानांचे आरोपपत्र दाखल करणे यातून या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन किती टोकाचा आहे हे दिसते, असेही पवारांनी नमूद केले.
Dr. Manmohan Singh – Pawar avoids CBI action against Modi
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : पंचगंगा दुथडी भरून वाहिली राधानगरी धरणाचा दरवाजा उघडून अडकला
- अमरावती : दोषींवर कारवाई करण्याची यावी , तोपर्यंत मृतदेह जिल्हा रुग्णालयातून उचलणार नाही ; नातेवाईकांनी घेतला आक्रमक पवित्रा
- मोदींच्या कानपूर सभेत दंगलीचा कट समाजवादीच्या कार्यकर्त्यांचाच!!; 5 कार्यकर्ते अखिलेश यादवांकङून बडतर्फ!!
- अतरंगी रे : सिनेमा अडचणीत, लव्ह जिहादला चालना देत असल्याच्या आरोपावरून चित्रपट बॅन करण्याची मागणी