• Download App
    Dr. Hedgewar Wisdom Award' is announced to Dr. Vijay Bhatkar ; will be given onThursday in Pune

    ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर ; पुण्यात गुरुवारी वितरण

    वृत्तसंस्था

    पुणे : संगणकतज्ज्ञ पद्म विभूषण डॉ. विजय पांडुरंग भटकर यांना ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील ‘श्री बडाबाजार कुमारसभा पुस्तकालय’ यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येणार आहे.‘Dr. Hedgewar Wisdom Award’ is announced to Dr. Vijay Bhatkar ; will be given onThursday in Pune

    एक लाख रुपये आणि सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कोरोना नियमांचे पालन करत निमंत्रितांच्या उपस्थितीत पुण्यात भांडारकर संस्थेच्या सभागृहात गुरूवारी (ता.९) सायंकाळी ६ वाजता डॉ. भटकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.



    समरसता गुरुकुलमचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर असतील.

    Dr. Hedgewar Wisdom Award’ is announced to Dr. Vijay Bhatkar ; will be given onThursday in Pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ