प्रतिनिधी
मुंबई : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शिंदे – फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा डाव काँग्रेसने रचला आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी दबाव वाढवत राहायचा, तर दुसरीकडे सरकार ओबीसी कोट्याला धक्का लावत असल्याचा आभास निर्माण करून सरकारला खेचून धरायचे, असा हा दुहेरी डाव आहे. Double ploy of Congress to confuse the government over Maratha-OBC reservation!!
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला अवघे काही तास उरले असताना सरकारला एक तासही वाढवून देणार नाही असा निर्वाणीचा इशारा जरांगेंनी दिला. या पार्श्वभूमीवर सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे दिली, तर सरकारला कोर्टात खेचू, असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी दिला. यातून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची कोंडी करायचा काँग्रेस डाव असल्याचे स्पष्ट होत आहे.
सरकारची कोंडी
मराठा समाजावर ठोस निर्णय वा घोषणा नाही. कुणबी प्रमाणपत्रांसाठी पुरेसे पुरावे शिंदे समितीला मिळालेले नाहीत. शिंदे समितीला महिन्याभराचा कालावधी लागू शकतो, तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्यास कोर्टात जाण्याचा ओबीसी समाजाचा इशारा दिला. अशा परिस्थिती जातनिहाय जनगणनेशिवाय आरक्षणाची 52% मर्यादा ओलांडता येणार नाही. जातनिहाय जनगणनेला कमीत कमी वर्षभराचा कालावधी लागू शकतो. या परिस्थितीत सरकारची कोंडी करण्याचा काँग्रेसचा डाव आहे.
ओबीसींचा इशारा
ओबीसी संघटना आणि सरकार यांच्यात महत्वाची बैठक झाली होती. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, असा सूर ओबीसी नेत्यांनी बैठकीत लावला होता. मराठा समाजाल सरसकट प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी संघटना आक्रमक होतील, अशा इशाराही यावेळी देण्यात आला होता. मराठवाड्यात अनेक मार्गांनी कुणबी प्रमाणपत्र वाटण्याचे काम सुरू आहे, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता. मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र ओबीसीमधून नको, अशी भूमिका कुणबी सेनेने घेतली, तर विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेचाही त्यांनी निषेध केला.
अजितदादा विरुद्ध मनोज जरांगे
कुणबींवरून अजित पवार विरुद्ध मनोज जरांगे असा सामना सुरू झालाय. मनोज जरांगेंच्या सभेला कुणबी का जातात? असा सवाल अजित पवारांनी आज कुणबी समाजाला केला. त्यावर आमची एकी पाहवत नाही का? असा उलट सवाल जरांगे पाटलांनी केलाय. आमच्यात फूट का पाडता?, अशी विचारणाही जरांगे पाटलांनी केली आहे.
Double ploy of Congress to confuse the government over Maratha-OBC reservation!!
महत्वाच्या बातम्या
- महुआ मोईत्रा वादापासून TMCने राखले अंतर; म्हटले- जो वादात अडकला, त्यानेच बोलावे; निशिकांत दुबे यांची लोकपालकडे तक्रार
- भारताचा मोस्ट वॉन्टेड लष्कर-ए-जब्बारचा संस्थापक दाऊद मलिक पाकिस्तानात ठार
- खासदार महुआ मोईत्रांच्या लाचखोरीतून प्रश्न घोटाळ्यातून तृणमूळ काँग्रेसने झटकले हात!!
- महुआ मोईत्राच्या अडचणी वाढण्याची चिन्हं! लोकसभा अध्यक्षांनंतर आता निशिकांत दुबे यांनी केली