विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्या आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचं नाही का? असा सवाल अनिल गोटे यांनी केला आहे. फोन टॅपिंग करायचे काही नियम आहेत की नाही? फोन टॅपिंग मॅन्युप्युलेट केलेलं आहे, असा आरोप अनिल गोटे यांनी केला.Don’t we have to talk privately with our wives? Anil Gote’s question on Devendra Fadnavis’ allegation
देवेंद्र फडणवीस यांनी वकील प्रवीण चव्हाण यांनी अनिल गोटेंना फोन केला होता, असा आरोप केला आहे. त्यावरुनही अनिल गोटे यांना आव्हान देत फडणवीसांनी हे आरोप सिद्ध करावेत, असं म्हटले आहे. यावर केंद्राकडून सत्तेचा दुरुपयोग कसा सुरु आहे, हे देखील यावरुन समोर आलं असल्याची टीका अनिल गोटे यांनी केली .
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर अनिल गोटे म्हणाले की, माझं नाव घेतलं याबाबत मी त्यांचा आभारी आहे, याशिवाय मला त्यांच्याबद्दल बोलताच आलं नसतं. आम्ही कुणाला अडकवण्यासाठी तिथे बसलो होतो असं फडणवीसांनी म्हटले आहे माझ्या एका केसबाबत मी तिथं बसलो होतो. चव्हाण नावाचे वकील जे आहेत, ते आमच्या धुळ्याला सातत्यानं येत होते. त्यामुळे त्यांना भेट घ्यायला गेलो होतो.
पण देवेंद्र फडणवीस यांना एवढी काय पडली आहे की तिथे जाऊन शूटिंग करायला लावलं? म्हणजे कुणी आपआपसामध्ये बोलूही नये. केंद्र सत्तेचा दुरुपयोग करते, ते यातूनच सिद्ध होतं.विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सनसनाटी आरोप केले आहेत.
सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक खेळ खेळत असल्याचा अतिशय गंभीर, स्फोटक आरोप पुराव्यांसह फडणवीसांनी केला केला. पेन ड्राईव्ह सादर करत त्यांनी हे आरोप केले आहे.
सुमारे 125 तासांच्या या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून त्यांनी सादर केलाय.
भाजपमधील काही नेते टार्गेटवर असल्याचा आरोप यावेळी फडणवीसांकडून करण्यात आलाय. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी नेते कसे टार्गेटवर होते, असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला आहे. या आरोपांमुळे राज्याचं राजकारण आता आणखी तापण्याची शक्यता आहे.
Don’t we have to talk privately with our wives? Anil Gote’s question on Devendra Fadnavis’ allegation
महत्त्वाच्या बातम्या
- सुमी येथून सर्व भारतीय नागरिकांना बाहेर काढले
- एक कथा : महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना.. लाव रे तो व्हिडिओ …शरद पवार यांना गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना संपवायचेच आहे…1 लाख 1 टक्के….
- फडणवीसांच्या “पेनड्राइव्ह बॉम्ब”मध्ये आहे तरी काय…??; बडे साब, मोठे साहेब!!; कसे रचले कारस्थान…??
- खुल्या दुमजली बसमधून हेरिटेज सहल