• Download App
    कार्तिक आर्यनचा सुशांत करू नका, गिधाडांनो त्याला फासावर लटकण्यास असह्य करू नका, कंगनाचा नेपो गॅँगला इशारा|Don't pacify Kartik Aryan, don't make vultures unbearable to hang him, Kangana warns Nepo gang

    कार्तिक आर्यनचा सुशांत करू नका, गिधाडांनो त्याला फासावर लटकण्यास असह्य करू नका, कंगनाचा नेपो गॅँगला इशारा

    कार्तिक आर्यन स्वत:च्या मेहनतीवर या ठिकाणी पोहोचला आहे आणि यापुढेही तो स्वत:च्या मेहनतीवरच पुढे जात राहील. फक्त ‘पापा जो’ आणि त्यांची नेपो गँग यांना विनंती आहे की, कृपया आता त्याला एकटं सोडा. सुशांतसिंह राजपूतसारखं आता कार्तिकच्या मागे लागून त्याला फासावर लटकण्यास असहय्य करू नका. गिधाडांनो कृपया त्याला एकटं सोडा, अशा शब्दांत प्रसिध्द अभिनेत्री कंगना रनौटने नेपो गॅँगवर निशाणा साधला आहे.Don’t pacify Kartik Aryan, don’t make vultures unbearable to hang him, Kangana warns Nepo gang


    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई: कार्तिक आर्यन स्वत:च्या मेहनतीवर या ठिकाणी पोहोचला आहे आणि यापुढेही तो स्वत:च्या मेहनतीवरच पुढे जात राहील. फक्त ‘पापा जो’ आणि त्यांची नेपो गँग यांना विनंती आहे की, कृपया आता त्याला एकटं सोडा.

    सुशांतसिंह राजपूतसारखं आता कार्तिकच्या मागे लागून त्याला फासावर लटकण्यास असहय्य करू नका. गिधाडांनो कृपया त्याला एकटं सोडा, अशा शब्दांत प्रसिध्द अभिनेत्री कंगना रनौटने नेपो गॅँगवर निशाणा साधला आहे.



    बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याला धर्मा प्रॉडक्शनचा चित्रपट ‘दोस्ताना २’मधून बाहेर करण्यात आलं आहे. त्यानंतर कार्तिकच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावरून पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे.

    पण कार्तिकच्या चाहत्यांसोबतच अभिनेत्री कंगना रणौतनंही कार्तिकचला आपला पाठिंबा दर्शवला आहे आणि यासोबतच तिनं करण जोहर आणि धर्मा प्रॉडक्शनवर जोरदार टीका केली आहे. या
    कंगनानं केलेल्या ट्विटमध्ये म्हटल आहे की,

    कार्तिक आर्यन या चिल्लर लोकांना घाबरण्याची गरज नाही. वाईट आर्टिकल लिहून आणि घोषणा करून हे लोक फक्त तुझा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मग यासाठी तुलाच जबाबदार ठरवून स्वत: मौन राहतील. त्यांनी सुशांतसिंह राजपूतचं ड्रग्सचं व्यसन आणि वाईट व्यवहाराची कथा अशीच पसरवली होती.

    कार्तिक आर्यन आम्ही तुझ्यासोबत आहोत. ज्यांनी तुला तयार केलं नाही ते तुला तोडूही शकत नाहीत. आज तुला कदाचित एकटं वाटत असेल पण असं वाटून घेण्याची अजिबात गरज नाही. प्रत्येकाला ‘ड्रामा क्वीन जो’बद्दल माहीत आहे. स्वत:वर विश्वास ठेव, अशा शब्दांत कंगनाने कार्तिकला दिलासाही दिला आहे.

    कार्तिक आर्यनच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावरून करण जोहरवर टीका केली आहे. एका चाहत्यानं लिहिलं, ‘अचानक नकारात्मक पीआर, कार्तिक आर्यनच्याच विरोधात का? अनपेक्षित आहे हे ! का एवढे वाईट आर्टिकल आणि पीआर नेहमीच बाहेरुन आलेल्या कलाकारांबद्दल होत असतं.

    याच कारणानं आम्ही सुशांतला गमावलं आहे. कंगना यांच्या विरोधात लढत आहे आणि आता कार्तिकला सुद्धा लढावं लागेल. ज्या प्रकारे कार्तिक आर्यन या लोकांच्या घाणेरड्या पॉलिटिक्सपासून स्वत:चा बचाव करतो आणि यांच्यापासून दूर राहतो हे खरंच उल्लेखनिय आहे. असाच चमकत राहा कार्तिक आर्यन.’

    Don’t pacify Kartik Aryan, don’t make vultures unbearable to hang him, Kangana warns Nepo gang

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ